
अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. लोक त्यासाठी दिवसरात्र संघर्ष करतात आणि तेव्हाच त्यांना दिवसातून दोनदा अन्न मिळू शकते. 'अन्न हे पूर्णबह्म', 'खाऊन माजावं पण टाकून माजू नये' असंही असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण आपल्या देशात आणि जगातही अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना खूप अन्न मिळू शकते आणि तरीही बरेच लोक भरपूर अन्न वाया घालवतात. काही ठिकाणी अर्ध्या लोकांना अन्न मिळतं तर काही ठिकाणी अर्ध्या लोकांना जेवायलाच मिळत नाही. अन्न वाया घालवणं, फेकून देण हे एखाद्या मोठ्या चुकीपेक्षा कमी नाही. जगातील कोणता देश सर्वात जास्त अन्न वाया घालवतो, ते जाणून घेऊया. ( photos : Social Media)

देशातील 100 कोटींहून अधिक लोकांना पौष्टिक अन्न मिळत नाही, परंतु तरीही अन्नपदार्थांची नासाडी ही एक मोठी समस्या आहे.

देशात अन्नटंचाई आणि कुपोषणाची स्थिती अशी आहे की येथील सुमारे 23.4 कोटी लोक कुपोषणाने ग्रस्त आहेत.

संपूर्ण जगभरात दरवर्षी 33 टक्के अन्न वाया जाते. या वाया जाणाऱ्या अन्नाच्या फक्त एक चतुर्थांश अन्नातून सुमारे 795 लोकांना जेवण मिळू शकतं.

जगातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सुमारे 79 किलोग्रॅम अन्न वाया घालवतो. तेच अन्न दररोज सुमारे 100 कोटी प्लेट्समधून खायला देता येऊ शकतं.

अन्न वाया घालवण्याच्या बाबतीत चीन अव्वल आहे. तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी 91.6 दशलक्ष टन अन्न वाया जाते, तर भारतात हा आकडा 68.8 दशलक्ष टन आहे.

अमेरिकेत लोक 19.4 दशलक्ष टन अन्न वाया घालवतात. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पाच आणि सहा टन अन्न फेकून दिले जाते.

प्रति व्यक्तीकडून अन्न वाया घालवण्याच्या बाबतीत मालदीव अव्वल आहे. येथे दरवर्षी प्रति व्यक्तीमागे 207 किलोग्रॅम अन्न फेकले जातं. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)