Non Veg : जगात सर्वाधिक मांस कुठे खाल्ले जाते, भारताचा नेमका कितवा क्रमांक?
भारतामध्ये दरवर्षी प्रति व्यक्ती मांसाचे सेवन अंदाजे 6 ते 7 किलो आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असून भारत या क्रमवारीत खूप खाली आहे. भारतात शाहाकारी लोकांचेही प्रमाण जास्त आहे.

जगभरात मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. भारतातच कोट्यवधी लोक मांसाहार करतात. दरम्यान, जगात सर्वाधिक मांसाहार कुठे केला जातो, तसेच भारताचा यामध्ये कितवा क्रमांक येतो, हे जाणून घेऊ या..
समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेत मांसाहार करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रति व्यक्ती मांसाच्या सेवनाचा विचार केला तर अमेरिका जगात आघाडीवर असल्याचे या अहवालात नमूद आहे.
लिथुआनियामध्ये मांसाहारी लोकांची संख्या मोठी आहे. येथे सुमारे 96 ते 97 टक्के लोक मांसाहारी पदार्थ खात असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच इथे बहुसंख्य लोक मांसाहार करतात.
भारतामध्ये दरवर्षी प्रति व्यक्ती मांसाचे सेवन अंदाजे 6 ते 7 किलो आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असून भारत या क्रमवारीत खूप खाली आहे. भारतात शाहाकारी लोकांचेही प्रमाण जास्त आहे.
भारताची ओळख मोठ्या शाकाहारी लोकसंख्येचा देश अशी असली, तरी सुमारे 75 ते 80 टक्के भारतीय अंडी, मासे खातात किंवा मांसाहार करतात. भारतात बरेच लोक दररोज मांसाहार न करता आठवड्यातून एक-दोन वेळा नॉनव्हेज खातात.