‘ही’ फुलं आहेत खाण्यायोग्य! आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी घटकांनी भरपूर फुलांबद्दल जाणून घ्या

फुले केवळ सजावट किंवा सुगंधासाठीच नसतात, तर त्यांचा आहारातही वापर केला जातो. जाणून घेऊया अशी ६ फुले, जी चवीसोबतच आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.

| Updated on: Nov 27, 2026 | 1:24 PM
1 / 6
गुलाब: गुलाब हे अनेकांचं आवडीचं फुल आहे. वेगेवेगळ्या रंगात हे फुल उपलब्ध असतं. गुलाबाच्या पाकळ्या थेट खाता येतात. गुलकंद, गुलाब सरबत आणि गुलाबपाणी यांसारख्या पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो.

गुलाब: गुलाब हे अनेकांचं आवडीचं फुल आहे. वेगेवेगळ्या रंगात हे फुल उपलब्ध असतं. गुलाबाच्या पाकळ्या थेट खाता येतात. गुलकंद, गुलाब सरबत आणि गुलाबपाणी यांसारख्या पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो.

2 / 6

जास्वंद: देवपूजेसाठी वापरलं जाणाऱ्या फुलामध्ये जास्वदांचा पहिला नंबर लागतो. या जास्वंदाच्या फुलांपासून चहा, सरबत आणि पावडर तयार केली जाते. मात्र याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

3 / 6

अपराजिता: सुंदर निळ्या रंगल्याच फुलं अनेकांच्या बागेची शान वाढवतं. निळ्या रंगाच्या अपराजिताच्या फुलांपासून हर्बल चहा तयार केला जातो. तसेच सॅलड आणि मिठाईंना नैसर्गिक रंग देण्यासाठीही याचा वापर होतो.

4 / 6

केशर: केशर हे क्रोकस फुलाच्या मधल्या भागातील तीन लालसर केसरदंड सुकवून तयार केले जाते. मिठाई, दूध आणि विविध पदार्थांना सुगंध, रंग व चव देण्यासाठी याचा वापर होतो.

5 / 6

कॅमोमाइल: सुंदर छोटी पांढरी फुलं बघून प्रसन्न वाटतं. कॅमोमाइलची फुले सुकवून त्यांचा चहा बनवला जातो. पचनास मदत आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा चहा लोकप्रिय आहे.

6 / 6

महत्त्वाची टीप: खाण्यासाठी नेहमी ओळख पटलेली, कीटकनाशकमुक्त आणि खाद्य वापरासाठी योग्य फुलेच निवडा. कोणतेही फूल खाण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us