Tea or Coffee : चहा की कॉफी, फायदा काय होतो, वाचा शरीराला काय चांगलं?

दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात.

| Updated on: Nov 27, 2026 | 5:30 PM
1 / 5
आजकाल चहा प्रत्येक व्यक्ती पिते. चहा न पिल्यास अनेकांना अस्वस्थ वाटते. चहा पिला की लगेच काही लोकांना ताजेतवाने वाटते. आजकाल कॉफी पिणाऱ्यांचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी यापैकी शरीरासाठी चांगले काय ते जाणून घेऊ या.

आजकाल चहा प्रत्येक व्यक्ती पिते. चहा न पिल्यास अनेकांना अस्वस्थ वाटते. चहा पिला की लगेच काही लोकांना ताजेतवाने वाटते. आजकाल कॉफी पिणाऱ्यांचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी यापैकी शरीरासाठी चांगले काय ते जाणून घेऊ या.

2 / 5

दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात. एक कप चहा किंवा कॉफीमधून साधारण 110 कॅलरीज मिळू शकतात.

3 / 5

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी चहा-कॉफीमधील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. चहा आणि कॉफीमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यातील कॅफिनचे प्रमाण. एक कप चहामध्ये साधारण 30 मिलीग्रॅम कॅफिन असते. तर एका कप कॉफीमध्ये हे प्रमाण 80 ते 100 मिलीग्रॅमपर्यंत असू शकते.

4 / 5

चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांमध्ये शरीरासाठी उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे दोन्ही पेयांचे मर्यादित सेवन केल्याने काही फायदे होऊ शकतात. चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन्स असतात. त्यांचे अतिसेवन शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकते.

5 / 5

टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी, कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us