GK : कोणत्या राज्यातून होतात सर्वात जास्त कलेक्टर व IPS? वाचून चकितच व्हाल!

UPSC : युपीएससी ही भारतातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. ही परीक्षा पास होणारे विद्यार्थी अधिकारी म्हणून काम करतात. भारतातील कोणत्या राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ही परीक्षा पास होतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Feb 01, 2026 | 9:00 PM
1 / 5
उत्तर प्रदेश (सर्वाधिक यशस्वी राज्य): भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे राज्य युपीएससी परीक्षेत सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिले आहे. 2024 च्या निकालात शक्ती दुबे (AIR 1) ही उत्तर प्रदेशचीच आहे. गेल्या 5 वर्षांपैकी 4 वेळा याच राज्याच्या विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

उत्तर प्रदेश (सर्वाधिक यशस्वी राज्य): भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे राज्य युपीएससी परीक्षेत सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिले आहे. 2024 च्या निकालात शक्ती दुबे (AIR 1) ही उत्तर प्रदेशचीच आहे. गेल्या 5 वर्षांपैकी 4 वेळा याच राज्याच्या विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

2 / 5

बिहार (दुसऱ्या क्रमांकावर): प्रशासकीय सेवांचे माहेरघर मानले जाणारे बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारच्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये आयएएस (IAS) होण्याचे प्रचंड आकर्षण असते आणि तेथील विद्यार्थी कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात.

3 / 5

राजस्थान (तिसऱ्या क्रमांकावर): गेल्या काही वर्षांत राजस्थानमधून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या हे राज्य आयएएस अधिकारी देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

4 / 5

महाराष्ट्र आणि तमिळनाडू: महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात. 2024 च्या निकालात पुण्याच्या अर्चित डोंगरे (AIR 3) याने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. तमिळनाडू देखील दक्षिण भारतातील सर्वाधिक यशस्वी विद्यार्थी देणारे राज्य आहे.

5 / 5

दिल्ली (युपीएससीचा हब): दिल्ली हे एक केंद्रशासित प्रदेश असले तरी, तिथून सर्वाधिक उमेदवार निवडले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे देशभरचे विद्यार्थी तयारीसाठी दिल्लीत (मुखर्जी नगर किंवा ओल्ड राजेंद्र नगर) येतात आणि तिथूनच परीक्षा देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us