
रोहित खत्री हा प्रसिद्ध फिटनेस एन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या रिलवर लाखोंनी लाईक्स असतात. विशेष म्हणजे त्याचे इन्स्टाग्रामवरही लाखोंनी फॉलोअर्स आहेत. त्याची आरके नावाची एक जीम आहे. त्या जीमवर कथितपणे गोळीबार झाल्याचा आरोप केला जातोय.

सोबतच त्याला 5 रुपयांची खंडणी मागितल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता रोहित खत्री याची पत्नी असलेल्या सोनिया खत्री चर्चेत आहे. तिदेखील एक एन्फ्लुएन्सर असून तिचे इन्स्टाग्रामवर 20 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सोनिया खत्री हे तिच्या चाहत्यांना आरोग्यसंबंधी माहिती देते. तसेच महिलांनी शरीरयसाठी बळकट करण्यासाठी नेमके काय करायला हवे, याबद्दलही ती सांगते. महिलांना ती वेगवेगळे डायटप्लॅन्सही देते. तिला व्यायामाची खूप आवड आहे. हे सोनिया खत्री आणि रोहित खत्री हे दोघेही फिटनेसबाबत रिल्स करतात.

महिलांनी जीममध्ये गेल्यानंतर कोणता व्यायाम करायला हवा, याचीही ती माहिती देत असत. विशेष म्हणजे फिटनेसबाबत माहिती देत असतानाच ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्सही अपलोड करते. त्यामुळे तिच्या रिल्स खूप व्हारल होतात.

सोनिया खत्रीने सांगितल्यानुसार महिलांनी गोड खाणे टाळले पाहिजे. तसेच तळलेले अन्नपदार्थही खाऊ नयेत. शुगर ड्रिंक्स, पेस्ट्री, केकही खाऊ नयेत, असा सल्ला सोनिया खत्री महिलांना देते.