कोण आहे मिस युनिव्हर्स 2026 जेनिफर बॅरेटो? जगभरातील सौंदर्यवतींना मागे टाकत पटकावला किताब
Miss universe 2026: पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने जगभरातील स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स २०२६'चा किताब पटकावला आहे. ही सुंदरी नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घ्या.

जेनिफर बॅरेटो ठरल्या मिस युनिव्हर्स २०२६: प्यूर्टो रिकोच्या २७ वर्षीय जेनिफर बॅरेटो यांनी मिस युनिव्हर्स २०२६ चा किताब पटकावला. ७५व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत जगभरातील सौंदर्यवतींना मागे टाकत त्यांनी हा मान मिळवला.
प्यूर्टो रिकोला मिळाला सहावा मुकुट: जेनिफर यांच्या विजयामुळे प्यूर्टो रिकोला सहाव्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला. यापूर्वी २००६ मध्ये जुलेका रिवेरा यांनी हा मुकुट जिंकला होता.
भारताची काजिया टॉप-३० मध्ये: भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय काजिया लिझ मेजो यांनी टॉप-३० मध्ये स्थान मिळवले. मात्र, त्यांना टॉप-१२ मध्ये प्रवेश करता आला नाही. ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांनी मिस युनिव्हर्स इंडिया हा किताब जिंकला होता.
जेनिफर यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य: जेनिफर यांनी मानसशास्त्र विषयात पदवी आणि सोशल वर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०२१ पासून त्या अमेरिकेतील फोर्ट कॅवाझोस येथे फॅमिली अॅडव्होकसी कार्यक्रमाशी जोडलेल्या आहेत.
पीडितांच्या मदतीसाठी केले काम: जेनिफर यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि बाल अत्याचाराच्या पीडितांना मदत केली आहे. तसेच प्रिव्हेन्शन स्पेशालिस्ट म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मिस युनिव्हर्स २०२६ चे टॉप-५ स्पर्धक: अंतिम पाचमध्ये न्यूझीलंडच्या जॉर्जिया वॅडिंग्टन, फिलिपिन्सच्या बीट्रिस मिलान-विंडोर्स्की, डोमिनिकन रिपब्लिकच्या मेलिसा नुनेझ, व्हेनेझुएलाच्या क्लारा वेगास आणि प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो यांचा समावेश होता. अखेर जेनिफर यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले.