सून म्हणून पाऊल ठेवलं अन् राजकारण गाजवलं; भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकरांची पूर्ण कुंडली!

रुपाली चाकणकर यांचा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे. पण सध्या त्या भोंदू बाबा प्रकरणामुळे वादात सापडल्या आहेत

| Updated on: Mar 20, 2026 | 2:54 PM
1 / 12
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली चाकणकर सध्या एका मोठ्या वादात सापडल्या आहेत. सिन्नरचा कथित ज्योतिषी अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

2 / 12
मात्र हा वाद नक्की काय आहे आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची राजकीय कारकिर्द कशी सुरु झाली, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

3 / 12
रुपाली चाकणकर या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव धारगडे आहे. त्यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून झाले. त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

4 / 12
रुपाली यांना सुरुवातीला राजकारणाची कोणतीही ओढ नव्हती. उलट, त्यांना अधिकारी बनायचे होते आणि त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला होता. मात्र, नियतीने त्यांच्यासाठी वेगळी वाट निवडली होती.

5 / 12
लग्नानंतर रुपाली या पुण्यातील धायरी येथील प्रसिद्ध चाकणकर कुटुंबात सून म्हणून आल्या. त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या आणि नगरसेविका होत्या.

6 / 12
सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेवत रुपाली यांनी सार्वजनिक जीवनात रस घेण्यास सुरुवात केली. २००२ पासून त्यांनी सुमारे ६ वर्षे महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना संघटित केले.

7 / 12
त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळाले. येथूनच त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला.

8 / 12
रुपाली चाकणकर यांच्या वक्तृत्व शैलीमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या. खडकवासला येथील कामानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी झाली.

9 / 12
२०१९ मध्ये चित्रा वाघ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या संधीचे सोने करण्यासाठी रुपाली चाकणकर यांची निवड थेट महिला प्रदेशाध्यक्षपदी केली. २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकार काळात त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. सध्या त्या याच पदावर कार्यरत आहेत.

10 / 12
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील अशोक खरात याला पोलिसांनी महिला अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. खरात हा स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेतो आणि अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगतो. रुपाली चाकणकर या खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान' या ट्रस्टच्या विश्वस्त आहेत.

11 / 12
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना (पाद्यपूजन) दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. खरातवर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्याने आणि त्याच्याकडे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने, चाकणकर यांनी अशा व्यक्तीचे पाय का धुतले, असा सवाल विचारला जात आहे.

12 / 12
विभाजपसह अनेक संघटनांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "हे एक महादेव देवस्थान आहे आणि सामाजिक कामासाठी आम्ही तिथे जोडले गेलो होतो. अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीही माहिती नव्हती. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतीलच.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us