
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. शर्वरीसाठी 2024 वर्षे लकी ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंज्या, महाराज आणि वेद या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं. कामामध्ये ती नेहमी तिचे पूर्ण प्रयत्न करताना दिसली आहे.

शर्वरीने सांगितलं की, तिला खूप संघर्ष करावा लागला. याआधी तिने सुलतान आणि सुई धागा या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. पण तिची निवड झाली नव्हती.

शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

शर्वरीचा जन्म 1996 साली असून तिचे वडील शैलेश वाघ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत. शर्वारीने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईमधूनच केले आहे.