Sophie Shine : शिखर धवनची बायको नेमकं काय करते? कोण आहे सोफी शाईन?

माजी क्रिकेटपटू शिखर धवनने लग्न केलं आहे. आपली गर्लफ्रेंड सोफीसोबत तो विवाहबद्ध झाला आहे. आता त्याची पत्नी नेमकं काय करते असे विचारले जात आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 12:56 AM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी आपली गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्यासोबत शिखरने लग्नगाठ बांधली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी आपली गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्यासोबत शिखरने लग्नगाठ बांधली आहे.

2 / 5

शिखर धवनच्या लग्नात क्रिकेटपटू युझवेंद्र चहल तसेच अन्य क्रिकेटरही सहभागी झाले. शिखर धवनची पत्नी सोफी शाईन नेमकी कोण आहे, ती काय करते हे जाणून घेऊ या...

3 / 5

सोफ शाईन ही मुळची आयर्लंड येथील रहिवासी आहे. ती शिखर धवनपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. सोफीचे शिक्षण आयर्लंड येथेच झाले. शालेय शिक्षण झाल्यानंतर तिने लाईमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॅसलरॉय कॉलेज येथून शिक्षण घेतले.

4 / 5

सोफीने तिच्या करिअरची सुरुवात आयरिश प्रोडक्ट कन्सल्टन्ट म्हणून काम केले. पुढे तिने अबू धाबी येथे नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये सेकंड व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम केले. आता ती दा वन स्पोर्टची सीओओ आहे.

5 / 5

सोफीच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिची संपत्ती शिखर धवनपेक्षा खूप कमी आहे. ती दोन कोटींची मालकीण असल्याचे बोलले जाते. शिखर आणि सोफीची भेटी 2023 मध्ये झाली. आता त्यांनी लग्न केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us