Who is Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी 6’ च्या ट्रॉफीवर कोरलं नाव, कोण आहे तन्वी कोलते ?
Who is Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी सीजन 6' चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. सर्व स्पर्धकांना मागे टाकून तन्वी कोलता या सीझनची विजेती ठरली. पण तन्वी नक्की आहे कोण, जाणून घेऊया माहिती...

रविवार, 19 एप्रिलच्या रात्री तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी 6' च्या अंतिम फेरीची ट्रॉफी जिंकली. या सीझनची विजेती ठरलेल्या तन्वीला लाखो रुपये, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी लाखो रुपयांचे व्हाउचर मिळाले. ( Photos : Instagram)

तन्वी कोलते विजती तर अभिनेता राकेश बापट हा या शोमध्ये प्रथम उपविजेता ठरला. सध्या सगळीकडे तन्वी बद्दलच चर्चा आहे, ती कोण, कुठली, काय करायची हे जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे.

तन्वी कोलते ही एक उदयोन्मुख मराठी अभिनेत्री, मॉडेल आणि टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे. ती 28 वर्षांची आहे. 7 फेब्रुवारी 1998 साली तिचा रत्नागिरीत जन्म झाला. तन्वीने आपल्या धाडसी आणि स्पष्टवक्त्या शैलीने स्वतःची ओळख निर्माण केली, ज्यामुळे तिला शो दरम्यान 'धाकड गर्ल' हा किताब मिळाला. तिच्या प्रभावी उपस्थितीमुळे ती या सीझनची पहिली कन्फर्म फायनलिस्ट ठरली होती.

तन्वीने तिच्या शालेय आणि महाविद्यालयीन काळात अनेक स्टेज शोज तसेच नाटकांमध्ये भाग घेतला. तिथूनच तिने मनोरंजन विश्वात प्रवेश केला.

मराठी मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. तन्वी कोल्टेने लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला.

अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी, तन्वीने सौंदर्य स्पर्धांमध्येही 'मिस रत्नागिरी 2018' आणि 'मिस गोवा 2020' सारखे किताब जिंकून नाव कमावले होतं. तिच्याकडे बी.टेकची डिग्री असून ती डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणूनही सक्रिय आहे.

बिग बॉस मराठी दरम्यान घरात असताना ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलली.त्यामध्ये तिने वडिलांना गमावल्याच्या वेदनेचाही उल्लेख केला होता, तिच्या शब्दांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं.