अंडी उकडताना भांड्यात लिंबू का टाकतात? सुगरण महिलांनाही माहिती नाही रहस्य

तुम्ही देखील अनेक ठिकाणी अंडी उकडताना पाहिली असतील. मात्र, अंडी उकडताना त्यात लिंबू का टाकतात याचे कारण अनेकांना माहिती नाही. ऐकून तुम्ही व्हाल चकित.

| Updated on: Apr 20, 2026 | 7:06 PM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीच्या अनेक बातम्या समोर येतात. ज्यामध्ये काही हटके पद्धती देखील पाहायला मिळतात.  असाच एक अनोखा प्रकार म्हणजे, अंडी उकडताना त्यामध्ये लिंबू का टाकतात? याचे उत्तर अनेक महिलांना माहिती नाही.

2 / 5

अंडी उकडताना ती तडकणे किंवा सोलताना अंड्याचा भाग टरफलासोबत निघणे ही समस्या अनेकांसोबत घडते.

3 / 5

अंडी उकडताना पाण्यात थोडासा लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड टाकल्यास अंडी फुटत नाहीत आणि सोलायलाही सोपी होतात.

4 / 5

लिंबातील सौम्य आम्लामुळे अंड्याच्या कवचावरचा ताण कमी होतो आणि आतला पडदा सैल होतो. यामुळे अंडी व्यवस्थित शिजतात आणि सोलताना सहज निघतात.

5 / 5

विशेष म्हणजे, यामुळे अंड्याच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही. लिंबू उपलब्ध नसेल तर त्याऐवजी एक चमचा व्हिनेगरही वापरू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us