
विकसित देशांमध्ये महिला उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात. पण काही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये, महिला लहान वयातच आई होतात. आता पाहूया, जगातील कोणत्या देशात महिला सर्वात कमी वयात आई होतात?

वर्ल्ड अॅटलासच्या रिपोर्टनुसार, जगात असे 21 देश आहेत जिथे सरासरी 18 ते 19 वयोगटातील महिला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देतात. यापैकी बहुतेक महिला दक्षिण आफ्रिकेतील आहेत.

रिपोर्टनुसार, अंगोला हा असा देश आहे जिथे महिला सर्वात कमी वयात आई होतात. अंगोलानंतर, भारताचा शेजारी देश बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे महिला सरासरी 18 व्या वर्षात आई होतात.

नायजर तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे कमी वयात आई होणाऱ्या महिलाचं सरासरी वय 18 वर्षे आहे. चाडमध्ये ही संख्या 18 वर्षे आहे. नायजर हा असा देश आहे जिथे 20 ते 24 वयोगटातील 51 टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना 18 वर्षांच्या आत पहिलं मूल झाले.

ही प्रवृत्ती विशेषतः आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये दिसून येते. शिक्षणाचा अभाव, जागरूकतेचा अभाव, गरिबी आणि पारंपारिक विचारसरणी ही याची मुख्य कारणे आहेत.

बांग्लादेशबद्दल सांगायचं झालं तर, हा मुस्लिम बहुल देश आहे, जिथे सुमारे 51 टक्के मुलींचे लग्न 18 वर्षापूर्वीच केलं जातं. बांग्लादेशातील महिलांना लवकर लग्न आणि बाळंतपणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.