28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमागे मोठा गेम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

भारतातील बहुतेक टेलिकॉम कंपन्या २८ दिवसांचे रिचार्ज प्लॅन का देतात यामागे एक व्यावसायिक रणनीती आहे. ३० किंवा ३१ दिवसांच्या महिन्यांमुळे वर्षभरात अतिरिक्त दिवस जमा होतात,

| Updated on: Jun 20, 2025 | 4:00 PM
1 / 10
भारतात इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लाँच करत असतात.

2 / 10
एअरटेल, जिओ, व्हीआय (Vi) यांसारख्या कंपन्या प्रीपेड आणि पोस्टपेडमध्ये अनेक पर्याय देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या कंपन्यांच्या बहुतेक प्लॅनची वैधता २८ दिवसांचीच का असते?

3 / 10
पूर्वी काही कंपन्याच २८ दिवसांचे प्लॅन देत होत्या, पण आता बहुतेक सर्वच कंपन्यांचे प्लॅन याच वैधतेचे असतात. यामागे एक व्यावसायिक गणित दडलेलं आहे.

4 / 10
२८ दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षातून १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावा लागतो.

5 / 10
जर महिना ३० दिवसांचा असेल, तर तुमच्या प्लॅनचे २ दिवस शिल्लक राहतात आणि जर महिना ३१ दिवसांचा असेल, तर ३ दिवस शिल्लक राहतात.

6 / 10
वर्षाच्या शेवटी हे अतिरिक्त दिवस एकत्र केले तर ते २६ ते २८ दिवसांपर्यंत होतात. म्हणजेच, कंपन्यांना दरवर्षी तुमच्याकडून जवळजवळ एका महिन्याच्या रिचार्जचा फायदा मिळतो.

7 / 10
फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असल्याने, कंपन्यांना वर्षभरात २८-२९ अतिरिक्त दिवस मिळतात, ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो.

8 / 10
याउलट, सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) अजूनही ३० दिवसांचे प्लॅन उपलब्ध करून देते, जे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते.

9 / 10
काही काळापूर्वी अशी चर्चा होती की टेलिकॉम नियामक प्राधिकरण (TRAI) कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचे प्लॅन देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. मात्र, आतापर्यंत ट्रायने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.

10 / 10
त्यामुळे सर्व कंपन्यांचे २८ दिवसांचे प्लॅन पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. यामुळे ग्राहकांना मात्र वर्षाला एक अतिरिक्त रिचार्जचा भुर्दंड सोसावा लागतो.