
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो.

काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना नाही. यामागचे नेमका कारण आता जाणून घेऊ या...

अनेक लोक टिळा लावताना रिंग फिंगरचा वापर करतात. रिंग फिंगरने टिळा लावल्यास मन शांत राहते, मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते. तर अंगठ्याने टिळा लावल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकजण रिंग फिंगर किंवा अंगठ्यानेच टिळा लावतात.

टिळा लावताने नेहमी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवली पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती टिळा लावत असेल तर डोक्यावर हात ठेवायला हवा. असे केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. तसेच नकारात्मक उर्जा संपते. भविष्यातील संकटांपासून आपल्याला ही उर्जा वाचवते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.