भारतातील या गावातच का येतात विदेशी नागरिक, काय आहे या गावाचं रहस्य?; तुम्ही ऐकलंय का कधी?

Mysterious Villages of India : भारतातील सुंदर खेडी ही जगासाठी आकर्षणाचा विषय आहे. देशातील अनेक गावं ही निसर्गाच्या कुशीत वसली आहेत. तिथलं नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि परंपरांचा अद्भूत मिलाफ पर्यटकांना आकर्षित करतो.

| Updated on: Aug 24, 2025 | 3:46 PM
1 / 6
भारतातील अत्यंत सुंदर आणि हटके गाव जगात नावाजलेली आहेत. देशातील अनेक गावात नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि परंपरांचा मिलाफ दिसून येतो. नितांत सुंदर आणि निसर्गाच्या कुशीतील या गावांमध्ये पर्यटक हरकून जातात. हिमाचल प्रदेशातील डोंगर रांगातील मलाना हे गाव असंच अनोखं आहे.

2 / 6
एका वृत्तानुसार, या गावातील लोक सिंकदरच्या सैनिकांचे वंशज असल्याचे मानल्या जाते. येथे पर्यटकांसाठी खास नियम आहेत. तरीही येथील जीवनशैलीने पर्यटक प्रभावित झालेले आहेत.

3 / 6
तर अजून एक नागालँडमधील खोनोमा हे गाव सुद्धा प्रसिद्ध आहे. ते आशियातील ग्रीन व्हिलेज मानण्यात येते. हे गाव स्वच्छता, पर्यावरण पूरक आणि हिरव्या शालूने नटलेलं आहे. येथील आदिवासींची संस्कृती, अत्यंत मनमोहक नैसर्गिक दृश्य पर्यटकांना भूरळ घालतात.

4 / 6
तर मावलीनॉन्ग हे आशियातील स्वच्छ गाव मानण्यात येते. या गावात लोक स्वच्छतेला अत्यंत महत्त्व देतात. हे गाव नेहमी फुलांनी बहरलेले असते.लिव्हिंग रूट ब्रिज हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. हा नैसर्गिक पूल पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक दाखल होतात.

5 / 6
स्पीति या नैसर्गिक खोबणीत किब्बर हे गाव वसलेले आहे. हे गाव जगातील सर्वात उंच असलेल्या गावांपैकी एक आहे. येथे बर्फाच्छादित डोंगर, स्वच्छ आणि निरभ्र आकाश, बौद्ध मठ दिसतात. पर्यटक खास ते पाहण्यासाठी वाट वाकडी करतात.

6 / 6
उत्तराखंडातील चोपता हे पण सौंदर्याची मुक्त हस्त उधळण असलेले एक छोटेसं गाव आहे. त्याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. येथे तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला ट्रॅक यासाठी खास बेस पाईंट आहे. येथे एखाद्या स्वर्गात आल्यासारखा नजारा आहे.