दारु पिण्यापूर्वी चिअर्स का म्हणतात? ग्लास एकमेकांवर आपटवण्यामागे कारण काय?

दारू पिताना 'चीअर्स' करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हा शब्द फ्रेंच शब्द 'चीअरे' वरून आला आहे ज्याचा अर्थ चेहरा किंवा डोकं असा होतो. काळाच्या ओघात हा शब्द आनंद आणि उत्साह दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला.

| Updated on: Sep 09, 2025 | 11:01 AM
1 / 8
पार्टी असो किंवा एखादा खास क्षण आपल्यापैकी अनेकजण सेलिब्रेशन करण्यासाठी दारु पितात. पण दारू पिताना आपल्यापैकी सर्वच जण एक गोष्ट नेहमी करतात ती म्हणजे चिअर्स. आता तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे, ते तर आम्ही नेहमीच करतो.

2 / 8
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण असे का करतो? चिअर्स हा शब्द नेमका कुठून आला, याचा अर्थ नेमका काय आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

3 / 8
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, दोन व्यक्ती जेव्हा एकत्र दारु पितात, तेव्हा ते दारुचा ग्लास एकमेकांना आपटतात. त्यासोबत ते चिअर्स बोलून पार्टीची खरी सुरुवात करतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरु आहे. आता यामागची रंजक कारणे काय, हे आपण जाणून घेऊया.

4 / 8
चिअर्स हा शब्द मूळ 'चीअरे' (chiere) या फ्रेंच शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ 'चेहरा' किंवा 'डोकं' असा होतो. जुन्या काळात हा शब्द उत्साह आणि आनंदाचे प्रतीक मानला जात होता.

5 / 8
कालांतराने हा शब्द आनंद व्यक्त करण्यासाठी आणि चांगल्या वेळेची सुरुवात दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला. सोप्या भाषेत सांगायचे तर चिअर्स म्हणजे आता चांगला काळ सुरू झाला आहे.

6 / 8
दारू पिण्यापूर्वी ग्लास एकमेकांना आपटण्यामागेही अनेक मनोरंजक कथा आहेत. आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये (डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा) आपल्याला जगाचा अनुभव देतात. दारू पिताना आपण डोळ्यांनी पेयाचा रंग पाहतो, जिभेने चव घेतो, नाकाने सुगंध घेतो आणि हाताने ग्लास पकडून त्याचा स्पर्श अनुभवतो.

7 / 8
या सगळ्या प्रक्रियेत एकच ज्ञानेंद्रिय वापरलं जात नाही, ते म्हणजे कान. या उणीवेला भरून काढण्यासाठी ग्लास आपटून एक विशिष्ट आवाज काढला जातो, ज्यामुळे कानही तृप्त होतात. यामुळे दारू पिणे हे पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून घेतलेला एक परिपूर्ण अनुभव असतो.

8 / 8
काही जर्मन परंपरेनुसार दारू पिण्यापूर्वी ग्लास एकमेकांवर आपटल्याने एक आवाज येतो. हा आवाज वाईट शक्ती किंवा भुतांना दूर ठेवतो. त्यामुळे लोक दारू पिण्याआधी एव्हील (वाईट) आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी ग्लास आपटले जातात.