
सैन्यामधील आयुष्य फार खडतर असतं. इथं सैनिकांना रोज नवनव्या दिव्यांना सामोरे जावे लागते. शत्रू कधीही समोरून हल्ला करू शकतो. त्यामुळेच सैनिकांना नेहमीच अलर्ट मोडवर राहावे लागते. याच कारणामुळै सैनिकांचे कपडे, त्यांचा पेहराव खास विचार करूनच निश्चित केलेला असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सैनिकांची हेअर स्टाईल अनेक तरुणांना आवडते. काही तरुण तर कास मिलिटरी हेअर कट करून घेतात. परंतु सैनिकांनी छोटे केस ठेवण्यामागे एक विशेष कारण आहे. यामागे खास उद्देश आहे. सैनिकांचे कानाजवळचे केस लहान आणि माथ्यावरील केस मोठे असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

केस, मिशा, दाढी ठेवताना काही नियम पाळावे लागतात. या नियमानुसारच सैनिकांचे कानाभोवतीचे केस बारीक असतात. तर माध्यावर केस तुलनेने मोठे असतात. सैन्यात शिस्त फारच महत्त्वाची असते. डोक्यावरचे केस विशिष्ट पद्धतीने कापणे हादेखील एक शिस्तीचाच भाग आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

एका विशिष्ट पद्धतीने केस कापल्याने सर्वच सैनिक समान पातळीवर येतात. यामधून सैनिकांमध्ये ऐक्य असल्याचे दिसून येते. केस छोटे असतील तर त्यांची निगराणी राखण्यात वेळ जात नाही. सोबतच कमी वेळात चांगली स्वच्छताही ठेवता येते. त्यामुळेच सैनिकांचे केस लहान असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सैनिकांचे केस लांब असतील तर ऐन युद्धाच्या वेळी त्यांना केस अडथळा ठरू शकतात. केस कुठे अडकू शकतात किंवा ते ऐन वेळी डोळ्यावर येऊ शकतात. ही अडचण उद्भवू नये म्हणून सैनिकांना केस कमी ठेवावे लागतात. तसेच ते विशिष्ट पद्धतीनेच कापावे लागतात. केस कमी असल्याने डोक्यावर जखम झाल्यास उपचार करणेदेखील सोपे होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)