महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो? नेमकं कारण काय?
एक मे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो, त्यामागचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या...

महाराष्ट्रासाठी 1 मे हा दिवस तसा अनेक अर्थांनी खास आहे. हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो, त्यामागचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांकडून आग्रह धरला जात होता. महाराष्ट्रातही मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे, अशी मागणी केली जात होती. या लढ्यात अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले.

त्यानंतर मराठी जनतेच्या लढ्यापुढे नमते घेत केंद्र सरकारने आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच राज्यभरात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

कामगारांच्या हक्कांसाठी तसेच कामच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा यासाठी 1886 साली अमेरिकेतील शिकागो येते कामगारांनी आंदोलन केले. कामाचे आठ तास असावेत यासाठी हे आंदोलन होते. या आंदोलनालाही यश आले. या संघर्षाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.