Medu Wada : मेदू वड्याला भोक का असतं ? छोट्याशा छिद्रामागे मोठं कारण..

Why does Medu vada have hole in the middle : मेदू वडा हा फक्त दक्षिणेतच नाही तर आजकाल सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडतो. मात्र तो पाहून अनेकांच्या मनात एक सवाल येतो - वड्याच्या मध्यभागी भोक का असतं ?

| Updated on: Jan 06, 2026 | 4:33 PM
1 / 6
Why does vada have hole in the middle : वड़ा, विशेषत: मेदू वड़ा (Medu vada) हा फक्त दक्षिणेतच नव्हे  तर संपूर्ण भारतात एक लोकप्रिय पदार्थ आहे. सांबार आणि चटणीसह खाल्ला जाणारा हा वडा, वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ असा असा असतो.  नाश्त्याला बरेच लोक मेदूवडा सांबार खाणं पसंत करतात. छोट्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या हॉटेलपर्यंत, हा पदार्थ हमखास मिळतोच. ( All Photos : Getty Images)

2 / 6
लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण आवडीने हा पदार्थ खातात. मात्र तरीही अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की मेदू वड्याच्या मध्यभागी छोटसं भोक का असतं ? तुम्हालाही हा प्रश्न कधीतरी पडला असेलच ना ? चला मग आज त्याचं उत्तर जाणून घेऊया.

3 / 6
मेदू वडा हा उडीद डाळीपासून बनवला जातो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. उदीड डाळ धुवून, ती भिजवून नंतर जाडसर वाटली जाते. त्यानंतर ती चांगली फेटून त्याला वड्याचा आकार देऊन ते तळले जातात. मात्र तो वडा बनवताना, त्याच्या मध्यभागी बोटाने एक छोटं भोक किंवा छिद्र केलं जातं.

4 / 6
वैज्ञानिक दृष्ट्या याचं कारण पाहिलं तर हे भोक महत्वाचं मानलं जातं. कारण मधोमध छिद्र असल्याने वडा आतूनही नीट तळला जातो. मध्ये जर ते भोक नसेल तर तो वडा आतून कच्चा राहण्याची शक्यता असते.

5 / 6
वड्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रामुळे, वडा तेलात सोडल्यावर ते वड्याच्या आत शिरतं. यामुळे वडा आतूनही नीट तळला जातो, कच्चा रहात नाही. त्यामुळे शेवटी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा परफेक्ट वडा तयार होतो.ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते.

6 / 6
वैज्ञानिकदृष्ट्या, त्या वड्याच्या मध्यभागी असलेले हे छिद्र एक विशिष्ट उद्देश पूर्ण करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हे छिद्र मेदू वड्याच्या पृष्ठभागाचा अधिक भाग तेलाच्या संपर्कात येऊ देतं. त्यामुळे तो लवकर शिजतो, तसेच कमी तेल शोषून घेतो. ज र वड्यात छिद्र किंवा भोक नसतं तर तो तळायला जास्त वेळ लागला असता, आणि वड्याने जास्त तेल प्यायलं असतं. आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगलं नाही.