IPL 2026 : एकच चुकीचा विचार मुंबई इंडियन्सच्या या अवस्थेला जबाबदार, त्यात सुधारणा केली तरच पुढे भविष्य
IPL 2026 : सध्याच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीमची कामगिरी खूपच खराब आहे. पॉइंट्स टेबलमध्ये 10 संघांमध्ये ही टीम शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. 10 पैकी 7 सामने मुंबई इंडियन्सने गमावले असून फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. नेट रनरेटही -0.649 आहे.

मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात लखनऊ सपुर जायंट्स विरुद्ध विजय मिळवला. लखनऊचं 229 धावांचं लक्ष्य 8 बॉल आणि 6 विकेट राखून पार केलं. बऱ्याच दिवसानंतर रोहित शर्माची बॅट या सामन्यात तळपली. त्याने 44 चेंडूत 84 धावा फटकावल्या. त्याने 6 फोर आणि 7 सिक्स मारले. (PTI)

रोहित शर्मा एका सामन्यात खेळला ही चांगली बाब असली, तरी त्याने आता फार काही होणार नाही. मुंबई इंडियन्सच प्लेऑफचं आव्हान जवळपास संपल्यातच जमा आहे. मुंबईच्या या खराब कामगिरीसाठी एकट्या हार्दिक पंड्याला दोष देऊन चालणार नाही. कारण एकट्या हार्दिक पंड्याची चूक नाहीय. (PTI)

मुंबई इंडियन्सचा संघ कागदावर बलाढ्य वाटतो. या टीममध्ये हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रोहित शर्मा हे वर्ल्ड कप विजेत्या संघातील चार-चार खेळाडू आहेत. पण या सीजनमध्ये चौघांनी निराशा केली. या चौघांपैकी निदान दोन खेळाडू जरी चालले असते तर मुंबईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये वर असती. (PTI)

मुंबई इंडियन्सच्या टीमचा मुख्य प्रॉब्लेम आहे वय. रोहित शर्माचं वय 37 च्या पुढे आहे. सूर्यकुमार यादव वयाच्या पसतिशीत आहे. बुमराह-पंड्या यांचं वय 32 च्या आसपास आहे. म्हणजे हे चार खेळाडू तिशीच्या पुढेच आहेत. याउलट या सीजनमध्ये दमदार खेळणाऱ्या टीम पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडे पाहिलं तर त्या टीममध्ये युवा खेळाडू आहेत. (PTI)

महत्वाचं म्हणजे या टीम्सनी प्रत्येक सीजनमध्ये सतत आपले प्लेयर बदलले आहेत. या उलट मुंबई इंडियन्स स्टार कल्चरवर अवलंबून राहिली. त्याच त्याच खेळाडूंना वारंवार संधी दिली. आता पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला जिंकायचं असेल तर संघात नव्या खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा करावा लागेल. चॅम्पियन खेळाडूंवर अवलंबून राहण्याऐवजी चॅम्पियन खेळाडू घडवावे लागतील. (PTI)