हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?
आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसं खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.

आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.

तुमच्या काही चुकांमुळे लोक तुमच्यापासून दूर होतात. तुमच्या आजूबाजूला हजारो लोक असूनही तुम्हाला एकटं-एकटं वाटतं. त्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे स्वार्थीपणा. तुम्ही काही ठिकाणी स्वार्थीपणा दाखवला की लोक तुमच्यापासून दूर होतात.

तुम्हाला कोणी बोलत असेल, त्याच्या अडचणी सांगत असेल तर त्या समजून न घेतल्यानेही लोक तुमच्यापासून दूर होतात. एखाद्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास असायला हवा. तसं शक्य होत नसेल तर लोक तुमच्यापासून दूर जातात.

राग हा मोठा विनाश घडवून आणतो. तुमच्या रागीट स्वभावामुळेही लोक तुमच्यापासून दूर होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची चूक असेल तर तुम्ही न रागवता त्या व्यक्तीला समजून घ्यावे. असे केल्याने लोक तुमच्यावर प्रेम करतील, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.