हॉटेलच्या रुममध्ये शिरताच टीव्ही टॉवेलने का झाकावा आणि फोन ड्रॉवरमध्ये का ठेवावा ?, निवृत्त कर्नलने सांगितले सिक्रेट…

एएनआयच्या एका पॉडकास्टमध्ये आपण सायबर क्राईमपासून कसे सुरक्षित रहावे याची माहिती एका निवृत्त कर्नल यांनी दिली आहे. यात त्यांनी तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करु नये म्हणून तुमच्या फोनची तुम्ही कशी काळजी घ्यावी हे सांगितले आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 10:34 PM
1 / 5
 एएनआयच्या एका पॉडकास्ट दरम्यान निवृत्त कर्नल हनी बक्षी यांनी सामान्य लोकांवर कशी पाळत ठेवली जाऊ शकते याबद्दल काही गुप्त बाबी सांगितल्या आहेत.

एएनआयच्या एका पॉडकास्ट दरम्यान निवृत्त कर्नल हनी बक्षी यांनी सामान्य लोकांवर कशी पाळत ठेवली जाऊ शकते याबद्दल काही गुप्त बाबी सांगितल्या आहेत.

2 / 5

तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करणारे तुमच्या तुमच्या वायफायचा देखील वापर करु शकतात. जर तुम्ही जेव्हा घरात वायफाय सुरु करता तेव्हा त्यात एक सूचना लिहिलेली असते की 'इनसिक्यु्अर कनेक्शन्स ' नो सिक्युरिटी..असे लिहिले असते म्हणजे हे संपूर्ण सुरक्षित नाही असेही निवृत्त कर्नल हनी बक्षी यांनी सांगितले.

3 / 5

निवृत्त कर्नल यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले की तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये शिरताच सर्वात मोठा टॉवले शोधा आणि तेथील स्मार्ट टीव्ही टॉवेलने झाका कारण कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असू शकते.

4 / 5

रात्री हॉटेलच्या रुममध्ये झोपताना तुमचे स्मार्ट फोन ड्रॉवरमध्ये लपवा कारण तुमच्या छायाचित्रांचा एकेदिवशी कोणी ब्लॅकमेल करण्यासाठी देखील वापर करु शकेल असेही या कर्नलने सांगितले आहे.

5 / 5

निवृत्त कर्नल हनी बक्षी यांनी यावेळी सल्ला दिला, "जेव्हा तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाता... सर्वात मोठा टॉवेल शोधा आणि तो टेलिव्हिजनवर ठेवा कारण कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे." त्यांनी लोकांनी झोपताना फोन ड्रॉवरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला कारण "एके दिवशी कोणीतरी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीद्वारे ब्लॅकमेल करु शकते. त्यामुळे खूप सावध रहा."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us