Tabu Nagarjuna Akkineni Breakup: ती सतत घरत यायची, राहायचीसुद्धा…तब्बू-नागार्जुनच्या ब्रेकअपवर अभिनेत्याची पत्नी स्पष्टच म्हणाली…

Tabu Nagarjuna Lovestory: दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन अक्किनेनी आणि बॉलिवू अभिनेत्री तब्बू यांची प्रेमकहाणी १० वर्षांच्या अफेअरनंतरही अपूर्ण का राहिली? अभिनेत्याच्या पत्नीची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 05, 2026 | 9:41 AM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा बहुचर्चित येणारा 100 व्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. किंग 100 या चित्रपटांत नागार्जुनसोबत अभिनेत्री तब्बूही झळकणार आहे.  तब्बू आणि नागार्जुन यांना पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा बहुचर्चित येणारा 100 व्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. किंग 100 या चित्रपटांत नागार्जुनसोबत अभिनेत्री तब्बूही झळकणार आहे. तब्बू आणि नागार्जुन यांना पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत.

2 / 5

वृत्तानुसार या दोघांनी एकमेकांना तब्बल १० वर्षे डेट केले आहे, पण इतका काळ एकत्र राहूनही त्यांची प्रेमकथा पूर्ण झालेली नाही. नागार्जुन यांचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबती यांच्याशी झाले होते. मात्र काही वर्षांनतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्यानं पुन्हा १९९२ मध्ये अभिनेत्री अमलासोबत दुसरं लग्न केले.

3 / 5

नागार्जुनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबाती यांच्याशी झाले होते; मात्र काही वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, 1992 मध्ये नागार्जुन यांनी अभिनेत्री अमला अक्किनेनी यांच्याशी लग्न केले. वृत्तांनुसार, ज्या काळात नागार्जुन आणि तब्बू यांच्यातील जवळीक वाढत होती, तेव्हा नागार्जुन आधीच विवाहित होते.

4 / 5

जेव्हा कधी नागार्जुन यांना तब्बूबद्दल प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याचे सांगितले. ती सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. अभिनेत्याच्या पत्नीनेही तब्बूचा उल्लेख चांगली मैत्रीण म्हणूनच केला. ती जेव्हा कधी हैदराबादला यायची आमच्या घरी यायची, राहायची, अजूनही आली की राहते,"

5 / 5

नागार्जुन आणि तब्बू पुन्हा एकदा किंग 100 यांचा बहुचर्चित सिनेमा 24 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. आर. ए कार्तिक दिग्दर्शित आणि अन्नपूर्णा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी या चित्रपटात संगीत दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us