जगातला सर्वात दुर्दैवी साप, कारण नसताना लोक घेतात जीव!

Wolf Snake : आज आम्ही तुम्हाला एक अशा सापाबद्दल सांगणार आहोत, ज्याला पाऊस आला की जंगल, बिळात नव्हे तर लोकांनी बांधलेल्या घरात राहायला आवडते. या सापाचे नाव कवड्या साप (वूल्फ स्नेक) असे आहे.

| Updated on: Aug 10, 2025 | 12:14 AM
1 / 5
Wolf Snake : आज आम्ही तुम्हाला एक अशा सापाबद्दल सांगणार आहोत, ज्याला पाऊस आला की जंगल, बिळात नव्हे तर लोकांनी बांधलेल्या घरात राहायला आवडते. या सापाचे नाव कवड्या साप (वूल्फ स्नेक) असे आहे.

Wolf Snake : आज आम्ही तुम्हाला एक अशा सापाबद्दल सांगणार आहोत, ज्याला पाऊस आला की जंगल, बिळात नव्हे तर लोकांनी बांधलेल्या घरात राहायला आवडते. या सापाचे नाव कवड्या साप (वूल्फ स्नेक) असे आहे.

2 / 5
वाईल्डलाईफ एक्स्पर्ट्सच्या मते या सापाला लोकांच्या घरात राहायला आवडतो. विशेषत:  हा साप पावसाळ्यात लोकांच्या घरात आढळून येतो. अन्य साप माती, झाडी, बिळात आढळतो. मात्र हा वूल्फ स्नेक भिंती, नाल्यांच्या जवळ असलेल्या भिंतींमध्ये आढळतो.

3 / 5
पश्चिम चंपारन तसेच पूर्ण बिहारमध्ये या वूल्फ स्नेकच्या तीन प्रजाती आढळतात. कॉमन वूल्फ, बार्ड वूल्फ आणि ट्विन वूल्फ अशी या प्रजातींची नावे आहेत. सापाची ही प्रजाती विषारी नसते. या सापाने दंश केला तर माणसाचा मृत्यू होत नाही.

4 / 5
 हा साप विषारी नसतो. तरीदेखील अनेकांना हा साप विषारी असल्याचे वाटते. त्यामुळेच तो दिसला की त्याला मारले जाते. या सापाच्या पाठीवरचा कणा स्पष्टपणे दिसतो. हा साप सामान्यत: काळ्या रंगाचा असतो. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे चट्टे असतात.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)