पुरुषांपेक्षा महिलांनाच हार्ट अटॅकचा जास्त धोका, काय आहेत कारणं?

आजकाल महिलांनाही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

| Updated on: Jul 07, 2025 | 5:50 PM
1 / 6
हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. विशेष म्हणजे पुरुषांसोबतच महिलांनाही हार्ट अटॅक  येत आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
हार्ट अटॅक येण्याची वेगवेगळी लक्षणं आहेत. जी लक्षणं पुरुषांमध्ये दिसतात तीच लक्षणं महिलांमध्येही दिसतात, असे नाही. एका रिसर्चनुसार ते ते 13 टक्के भारतीय महिला या कोरोनरी आर्टेरी डिसीजशी लढत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
गेल्या दोन दशकांत महिलांमधील हार्ट अटॅकचे प्रमाण 300 टक्क्यांनी वाढले आहे. महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. यात उलटी, मळमळ, पाठ किंवा जबड्यात वेदना असे काही लक्षणं दिसू शकतात. काही महिलांमध्ये चक्कर येणे, छातीत खालच्या भागात किंवा पोटात वरच्या भागात त्रास होत असल्याचेही लक्षण दिसून येते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.सोबतच उच्च रक्तदाब, मधूमेह, लठ्ठपणा, तणाव, अनियमित जीवनशैली यामुळेही महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
मात्र योग्य काळजी घेतल्यास महिलांना हार्ट अटॅकपासून स्वत:ला वाचवता येऊ शकते. काही लक्षणं जाणवल्यास दुर्लक्ष करू नये. हार्ट अटॅकची लक्षणं जाणवल्यास ईसीजी, ब्लड प्रेशर, कोलोस्टेरॉल, रक्तातील साखर इत्यादींची तपासणी करावी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)