अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांपासून साकारली भारतमातेची भव्य मोझॅक प्रतिमा

डोंबिवलीत कायम नवनवीन प्रयोग होत असतात. आता देखील डोंबिवलीकरांनी दिव्यातून भारतमाता साकारली आहे. तब्बल अडीच लाख रंगीत पणत्यांतून भारतमाता साकारली आहे. २८ वर्षांची परंपरा जपत डोंबिवलीकरांनी देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा जागतिक आदर्श घडवला आहे.

| Updated on: Dec 21, 2025 | 10:19 AM
1 / 5
वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यावर डोंबिवलीकरांनी देशभक्तीचा अभूतपूर्व आविष्कार सादर केला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांपासून साकारण्यात आलेली भारतमातेची भव्य मोझॅक प्रतिमा सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
या अनोख्या उपक्रमातून डोंबिवलीत दिव्यांचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला असून डोंबिवलीकरांचा आवडता ‘उत्सव’ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. डोंबिवलीतील सांस्कृतिक, सामाजिक आणि देशभक्तीपर परंपरेला नवा आयाम देणारा हा भव्य उपक्रम डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या वतीने साकारण्यात आला.

3 / 5
वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि डोंबिवलीकरांच्या सामूहिक सहभागातून अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांनी भारतमातेची भव्य मोझॅक प्रतिमा उभी करण्यात आली.

4 / 5
२८ वर्षांपासून हा उत्सव केवळ कार्यक्रम न राहता ‘गावकीचा उत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या माध्यमातून नवनवीन उद्योजक, कलाकार, विद्यार्थी, खेळाडू आणि स्थानिक कलावंतांना संधी देण्याचे काम सातत्याने केले जात आहे.प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणि वेगळे आकर्षण असावे, या उद्देशाने कार्यकारी नियोजन केले जाते.

5 / 5
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेमध्ये वंदे मातरम गीताचे महत्त्व अधोरेखित केले होते. याच राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारतमातेला अर्पण म्हणून अडीच लाख मातीच्या दिव्यांतून ही प्रतिमा साकारण्यात आली.