जगातील सर्वात महाग कॉफी, हत्तीच्या विष्ठेचा वापर करून… नेमकी विशेषता काय?

Most Expensive Coffee : जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून 'ब्लॅक आयव्हरी कॉफी' ची ओळख आहे. ही कॉफी तयार करण्यासाठी हत्तीची मदत घेतली जाते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 8:57 PM
1 / 5
निर्मितीचे ठिकाण आणि पद्धत : ही कॉफी प्रामुख्याने थायलंडमध्ये तयार केली जाते. ही कॉफी बनवण्यासाठी हत्तींची मदत घेतली जाते. हत्तींना 'अरेबिका' जातीच्या कॉफीच्या पिकलेल्या चेरी खायला दिल्या जातात.

2 / 5
नैसर्गिक प्रक्रिया : जेव्हा हत्ती या कॉफी चेरी खातो, तेव्हा त्याच्या पोटातील एन्झाइम्स आणि बॅक्टेरिया कॉफी बीन्समधील प्रथिने तोडतात. यामुळे कॉफीचा कडूपणा कमी होऊन ती अतिशय 'स्मूद' होते.

3 / 5
बीन्स मिळवण्याची पद्धत : हत्तीने चेरी खाल्ल्यानंतर साधारण 15 ते 70 तासांनी या कॉफी बीन्स हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडतात. या बीन्स गोळा केल्या जातात. त्यानंतर त्या अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ धुतल्या जातात आणि उन्हात वाळवून रोस्ट (भाजल्या) केल्या जातात. ही कॉफी पूर्णपणे आरोग्यदायी आणि सुरक्षित असते.

4 / 5
महाग असण्याचे कारण : ही कॉफी पूर्णपणे आरोग्यदायी आणि सुरक्षित असते. 33 किलो कॉफी चेरी हत्तीला खाऊ घातल्यानंतर त्यातून केवळ 1 किलो कॉफी बीन्स मिळतात. ही प्रक्रिया नैसर्गिक आणि खूप संथ आहे.

5 / 5
किंमत आणि चव : या कॉफीचे उत्पादन कमी होते, या कॉफीची किंमत साधारण 50 ते 80 हजार रुपये प्रति किलो असते. ही कॉफी चवीला कमी कडू, चॉकलेटी आणि थोडी गोडसर लागते.