WPL 2023 : मुंबई इंडियन्सची ‘या’ खेळाडूंच्या जोरावर अंतिम फेरीत धडक, वाचा स्पर्धेतील कामगिरी

| Updated on: Mar 25, 2023 | 1:17 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं जबरदस्त कामगिरी केली आहे. एलिमिनेटर फेरीत युपी वॉरियर्सचा 72 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे.

1 / 6
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीत आठ पैकी दोन सामने गमावले. मात्र रनरेटच्या जोरावर दिल्ली थेट अंतिम फेरीत पोहोचली. तर मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागला. मात्र युपीला पराभूत करत मुंबईनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. (फोटो - PTI)

2 / 6
मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर या स्पर्धेत सर्वोत्तम कर्णधार ठरली आहे. प्रत्येक सामन्यात तिची रणनिती जबरदस्त ठरली आहे. इतकंच काय पराभवानंतरही संघांनं कमबॅक केलं आहे. तिने 9 सामन्यात 244 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो - PTI)

3 / 6
मुंबईची अष्टपैलू नॅट स्किवर ब्रंट या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. तिने 9 सामन्यात 54.40 च्या सरासरीने 272 धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 13 गडी बाद केले आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात तिने 36 धावा केल्या आमि 3 गडी बाद केले. (फोटो - PTI)

4 / 6
सायका इशाकनेही आपल्या खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्पर्धेत तिची कामगिरी सर्वोत्तम आहे. तिने 9 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत. सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत ती दुसऱ्या स्थानी आहे. दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग आणि शफाली वर्माला तिने तंबूचा रस्ता दाखवला आहे. (फोटो - PTI)

5 / 6
इंग्लंडची इस्सी वोंग मुंबईच्या संघात खेळत आहे.फलंदाजी आणि गोलंदाजीत तिने चमकदार कामगिरी केली आहे. 9 सामन्यात तिने 12 गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे एलिमिनेटर सामन्यात हॅटट्रीक घेतली आहे. ही वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिली हॅटट्रीक आहे. (फोटो - PTI)

6 / 6
हॅली मॅथ्युजनेही संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे.सर्वात जास्त धावा आणि विकेट घेण्याच्या यादीत ती टॉप 5 मध्ये आहे. 9 सामन्यात तिने 13 गडी बाद केले आहेत. तस्चे 258 धावा केल्या आहेत. (फोटो - PTI)