22 वर्षांची कुस्तीपटू, रोज व्यायाम करायची, पण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक 22 वर्षीय कुस्तीपटू तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

| Updated on: May 05, 2025 | 6:03 PM
1 / 5
अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक 22 वर्षीय कुस्तीपटू तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक 22 वर्षीय कुस्तीपटू तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

2 / 5
प्राप्ती सुरेश विघ्ने असे मृत्यू झालेल्या कुस्तीपटू तरूणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी राज्यस्तरापर्यंतची कुस्ती स्पर्धा खेळलेली होती.

3 / 5
माहितीनुसार सुरुवातीला तिला उलट्या व पाय दुखण्याचा त्रास झाला होता. हा त्रास झाल्यानंतर मी घरी येत आहे, असा फोन तिने आपल्या भावाला केला होता.भावाने तिला अमरावतीवरून सकाळी घरी आणले होते. घरी आराम करत असतानाच अचानक तिची प्रकृती बिघडली होती.

4 / 5
प्रकृती बिघडल्यानंतर तिला तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

5 / 5
अतिशय तंदुरुस्त व दररोज व्यायाम करणाऱ्या व राज्यस्तरावर कुस्ती खेळणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.