IND vs NZ : यशस्वी जैस्वालच्या नावावर नकोशा, लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद, विराट कोहलीला टाकलं मागे
IND vs NZ : क्राइस्टचर्च टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली. ओपनर यशस्वी जैस्वाल पहिल्याच ओव्हरमध्ये खातं न खोलताच तंबूत परतला. या सोबतच त्याच्या नावावर एक नकोशा रेकॉर्डची नोंद झाली.

वेलिंग्टन टेस्ट मॅच मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वालचं शतक हुकलं होतं. त्यानंतर आता क्राइस्टचर्च टेस्ट मॅच मध्ये त्याला चांगली सुरुवात करता आलेली नाही. (Photo: PTI)
दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची बॅटिंग सुरु झाली. मॅट हेनरीच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बोल्ड झाला. त्यामुळे टीम इंडियाला चांगली स्टार्ट मिळू शकली नाही. (Photo: PTI)
यशस्वी जैस्वाल दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये सहा चेंडू खेळला. पण तो खातं उघडू शकला नाही. शुन्यावर बाद होण्याचा नवीन रेकॉर्ड त्याने नोंदवला आहे. (Photo: PTI)
युवा ओपनर यशस्वी जैस्वाल WTC मध्ये सर्वाधिक 8 वेळा शून्यावर आऊट होणार भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकलं. कोहली सातवेळा शून्यावर बाद झालाय. तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पूजारा आहे, सहावेळा तो बाद झालाय. (Photo: PTI)
यशस्वी जैस्वाल आता सर्व SENA देशात टेस्ट मॅचमध्ये शून्यावर आऊट होणारा सहावा भारतीय बनला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, हरभजन सिंह, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे सर्व गोलंदाज या लिस्टचा भाग आहेत. (Photo: PTI)