AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन-रेखा यांच्या नात्यावर नको ते वक्तव्य करणारा ‘तो’ कोण! दिग्दर्शकाने दिली थेट वॉर्निंग

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अशात अमिताभ बच्चन आणि रेखा याच्या नात्यावर नको के वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन-रेखा यांच्या नात्यावर नको ते वक्तव्य करणारा 'तो' कोण! दिग्दर्शकाने दिली थेट वॉर्निंग
Amitabh Bachchan
| Updated on: Nov 28, 2026 | 2:32 PM
Share

Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. तेव्हा दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. आज दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण आजही त्यांच्या नात्यावर चर्चा होतच असतात. आता देखील असंच काही झालं आहे. सांगायचं झालं तर, समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) च्या दुसऱ्या सीझनमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल विनोदी टिप्पणी केल्यानंतर, भुवन बाम आणि मुकेश छाबरा यांची चर्चा रंगली आहे.

शोच्या नुकत्याच आलेल्या भागात भुवन हा नवाजुद्दीन सिद्दीकी, मुकेश छाबरा आणि कौस्तुभ अग्रवाल यांच्यासोबत पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये पुन्हा एकदा तोच बेधडक आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळाला, ज्यासाठी हा शो ओळखला जातो. एपिसोडमध्ये स्पर्धक प्रतीक भारद्वाज याने अमिताभ बच्चन यांची वेशभूषा करून मंचावर प्रवेश केला. त्याने अमिताभ बच्चन यांचा आवाज, हावभाव आणि बोलण्याची शैली यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला.

प्रतीक याचा अभिनय पाहिल्यानंतर भुवन बाम याने स्पर्धकाला मिश्किलपणे विचारलं, “तुमच्या टॅलेंटला काही रेखा (मर्यादा) आहे का?” भुवन याच्या या वन-लाइनरमधून अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या विषयाकडे अप्रत्यक्षपणे इशारा करण्यात आला. त्यांच्या या टिप्पणीमुळे प्रेक्षकांसह पॅनेलमधील सदस्यांमध्येही हशा पिकला.

मात्र, भुवन यांच्या या विनोदावर कास्टिंग डायरेक्टर आणि चित्रपट निर्माता मुकेश छाबरा यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी भुवन याला मजेशीर अंदाजात सावध करत म्हटलं, “मित्रा, तुझं फिल्मी करिअर तर आताच सुरू झालं आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला.

अमिताभ बच्चन आणि रेखा

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी दो अंजाने, खून पसीना , मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, राम बलराम, सिलसिला यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण तेव्हा बिग बी यांचं लग्न अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत झालं होतं. बिग बींनीसोबत असलेल्या नात्याचा खुलासा रेखा यांनी अनेकदा केला. पण अमिताभ बच्चन यांनी यावर कायम मौन बाळगलं.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...