AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी; आता लोक…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा जोरदार निशाणा

शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी असल्याची टीका माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. आता लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले.

शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी; आता लोक...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा जोरदार निशाणा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 2:31 PM
Share

पवन येवले, नाशिक : शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असताना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधयेकावरून सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आता काँग्रेस नेत्याकंकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. काँग्रेस नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांची नाव न घेता शरद पवार यांच्या पक्षावर टीका केली आहे. या पक्षाने आघाडीच्या छाताड्यात खंजीर खुपसलं आहे, अशी कठोर शब्दात त्यांनी टीका केली आहे.

इंडिया आघाडीतील मतभेदावर भाष्य करताना नितीन राऊत यांनी म्हटलं की, ‘मला इंडिया आघाडीत भूकंप वाटत नाही. कारण ज्या नेत्याच्या पक्षाचे नाव तुम्ही सांगतात, मुळातच तो पक्ष विश्वासघातकी आहे.  त्यांनी याआधी कोलांट्या उड्या लक्षात घेतल्या, तर आजपर्यंत त्यांनी असेच काम केलेले आहे.  त्यांनी याआधी विश्वासघात केलेला आहे. नेत्यांचा नेतृत्वाचा आणि आघाडीचा आणि आज पुन्हा त्यांनी एक खंजीर खुपसला आहे. लोक निश्चितपणे जाब विचारल्याशिवाय  राहणार नाही’.

नितीन राऊत पुढे म्हणाले, ‘ मोदी सरकारने नारी वंदन बिल आणलं होतं. त्याला संपूर्ण सभागृहाणे मंजुरी दिली होती. त्यावेळेला महिला आरक्षण लागू थांबवण्याचे काही कारण नव्हतं. 2011 सालचे निकष घ्यायचे होते. आज डिलिमिटेशनबद्दल बोलतााना 2011 सालचा निकष घेत आहात. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यांना कोणालाही न्याय द्यायचा नाही. ना महिलांना…ना देशाला… स्वतःचं चांगभलं करायचं आहे, त्यासाठी हा खटाटोप आहे’.

काँग्रेस खासदाराची मोदी सरकारवर टीका 

खासदार बळवंत वानखेडे म्हणाले, ‘लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढवण्याच्या निर्णयामागे अनेक प्रश्न असून मोदी सरकारच्या विधेयकाला काँग्रेसचा ठाम विरोध आहे. या बिलाच्या माध्यमातून संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवलं आहे.  याआधी हे विधेयक मांडण्यात आले होते. मात्र मतदानात ते नामंजूर झाले होते. आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे विधेयक आणण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहे, असा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...