AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांना घरी बोलवायचा, बायको झोपली की तिच्यासोबत…3 वर्षांपासून सुरू होतं कृत्य, व्हिडीओ पाहून बायको हादरली!

आरोपी पती आपल्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्यासाठी आपल्या घरात इतर पुरुषांना बोलवायचा. सलग तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. परपुरुषाला आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याचीच एका प्रकारे तो परवानगी द्यायचा.

पुरुषांना घरी बोलवायचा, बायको झोपली की तिच्यासोबत...3 वर्षांपासून सुरू होतं कृत्य, व्हिडीओ पाहून बायको हादरली!
husband and wifeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 2:40 PM
Share

पती-पत्नीचं नातं हे प्रमाचं आणि विश्वासाचं आहे. एकदा विश्वासाला तडा गेला की मात्र हे नातं संपुष्टात यायला सुरुवात होते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नराधम पती आपल्या पत्नीला गुंग यायचे औषध देऊन तिच्यावर अन्य पुरुषांना बलात्कार करायला लावायचा. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हा संतापजनक प्रकार समोर आलाय. पीडित महिलेलाही यावर विश्वास बसत नव्हता. परंतु स्वत:वर झोपेत झालेल्या अत्याचाराचे व्हिडीओ पाहून संबंधित महिला हादरून गेली आहे. माझा पती असं काही करू शकेल, याचा विश्वासही तिला बसत नाहीये.

नेमकं काय घडलं?

आरोपी पती आपल्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्यासाठी आपल्या घरात इतर पुरुषांना बोलवायचा. सलग तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. परपुरुषाला आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याचीच एका प्रकारे तो परवानगी द्यायचा. हे कृत्य करण्यासाठी पती आपल्या बायकोला झोप येण्याचे औषध द्यायचा. पत्नी झोपल्यानंतर परपुरुषाला बोलावून अत्याचाराचे धक्कादायक कृत्य केले जायचे. अगोदर संबंधित आरोपीने असे कृत्य करत नसल्याचा दावा केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर 60 पेक्षा अधिक आरोप त्यांने मान्य केले आहेत. फक्त 3 वर्षांपासूनच नव्हे तर लग्न झाल्यापासून हे अत्याचार सुरू होते, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय.

पत्नीला झोप यावी आणि तिच्यासोबत काय घडतंय हे समजून नये यासाठी संबंधित आरोप इंटरनेटवर वेगवेगळ्या गोळ्या, औषधांच शोध घ्यायचा. पत्नीवर अत्याचार होत असताना तो सर्व प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. हेच व्हिडीओ तो ऑनलाईन संकेतस्थळांवर इतर पुरुषांना शेअर करत असे. NN आणि द इन्डिपेंडंटच्या रिपोर्टनुसार ही घटना ग्रेटर मॅनचेस्टर येथील स्टॉकपोर्ट भागातील आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मॅनचेस्टर मिनशुल स्ट्रीट क्राउन कोर्टात एकूण 9 पुरुषांविरोधात खटला सुरू आहे. महिलेच्या घरी जाऊन तिचा लैंगिक छळ करणे, ऑनलाईन फोटो, व्हिडीओ अपलोड करून गैरप्रकाराला प्रोत्साहन देणे, असे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत. एकूण आठ आरोपींनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तर नवव्या आरोपीने एकूण 3 गुन्हे कबुल केले असून इतर आरोपांना फेटाळले आहे. या प्रकरणी काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?