लोकप्रिय मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप; प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका आता निरोप घेत आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला होता. त्यातील कलाकारांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 3:26 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 27 मे 2024 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणाऱ्या या मालिकेचं नाव आहे 'येड लागलं प्रेमाचं'. या मालिकेतील राया आणि मंजिरीच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

2 / 5
अभिनेत्री पूजा बिरारी आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘साता जल्माच्या गाठी’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला विशाल निकम यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नुकताच या मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला.

3 / 5
मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळाला. आता मालिका संपल्यानंतर त्यातील काही कलाकार भावूकसुद्धा झाले आहेत.

4 / 5
मालिकेच्या टीममधील साहिल कुमारनं सोशल मीडियावर लिहिलं, 'काल शूटिंग संपलं आणि आज जाणवतंय की फक्त शूटिंग नाही तर एक सवय संपली आहे. रोज भेटणं, एकत्र काम करणं, हसणं-मस्करी.. कधी ही माणसं फक्त टीममधील न राहता आपली माणसं बनली ते कळलंच नाही.'

5 / 5
'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका रात्री 11 वाजता प्रसारित केली जात होती. या मालिकेचा टीआरपीसुद्धा चांगला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी मालिका बंद करण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेचे आतापर्यंत 700 पेक्षा अधिक एपिसोड्स प्रसारित झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us