AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा चेहऱ्याचा ग्लो

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी नेहमी महागडी स्किन केअर प्रोडक्ट्सच वापरावे असे नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर घरगुती स्किन केअरमध्ये केला जाऊ शकतो. जाणून घ्या ही पदार्थ कोणती आणि त्यांचा वापर कसा करायचा.

महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा चेहऱ्याचा ग्लो
Skin care
| Edited By: | Updated on: Sep 27, 2026 | 4:08 PM
Share

त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र, काही लोक स्किन केअर रूटीनमध्ये घरगुती उपायांचाही समावेश करतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांमध्ये त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकणारे घटक असतात आणि त्यांचा वापर विविध पद्धतींनी केला जातो. या पदार्थांचा वापर स्किन केअरसाठी करून तुम्ही चेहऱ्याचा ग्लो वाढवू शकता. पण हे वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करणे उत्तम. चला तर मग जाणून घ्या स्किन केअरमध्ये किचनमधील कोणत्या पदार्थांचा समावेश करता येतो.

जवस जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. स्किन केअरसाठी जवसापासून जेल तयार करून त्याचा वापर केला जातो. यासाठी जवसाच्या बिया पाण्यात उकळून मिश्रण घट्ट होऊ द्या. त्यानंतर ते गाळून मिळालेला जेल वापरता येतो. हा जेल मधासोबत मिसळून फेस मास्क म्हणूनही लावता येतो. साधारण १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर चेहरा पाण्याने धुवा. प्लम्प आणि हायड्रेटेड त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी या जेलचा पातळ थर चेहऱ्यावर लावता येतो. याशिवाय जवसाच्या जेलमध्ये दही मिसळून फेस पॅक तयार करावा. हा पॅक सुमारे १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर स्वच्छ धुवा. या जेलचे आइस क्यूब्स तयार करून त्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. साधारण एक मिनिट मसाज केल्यानंतर त्वचेला थंडावा आणि फ्रेशनेस जाणवू शकतो.

काकडी काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती हायड्रेशनसाठी ओळखली जाते. स्किन केअरमध्ये काकडीचा रस, स्लाइस किंवा जेलच्या स्वरूपात वापर केला जातो. काकडीचा रस एलोवेरा जेल आणि गुलाब पाण्यासोबत मिसळून फेस मास्क तयार करता येतो. हा मास्क साधारण १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता. याशिवाय थंड काकडीच्या स्लाइस चेहऱ्यावर काही मिनिटे ठेवल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते. काकडीचा रस आणि गुलाब जल एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा फेस मिस्ट म्हणून किंवा कॉटनच्या मदतीने त्वचेवर वापर करता येतो. काकडीच्या रसापासून तयार केलेले आइस क्यूब हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवल्याने त्वचेला थंडावा आणि फ्रेशनेस मिळू शकतो.

मध मधामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्वचेची काळजी घेताना अनेक होममेड रेमेडीमध्ये मधाचा वापर केला जातो. मध आणि हळद एकत्र करून फेस पॅक तयार करता येतो. हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवून नंतर धुवावा. चेहऱ्यावरील डागांवर कच्चा मध काही वेळ लावावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी मधात काही थेंब पाणी मिसळून त्याने चेहऱ्यावर मसाज करून चेहरा धुवावा. तसेच मध आणि साखर एकत्र करून लिप स्क्रब तयार केला जातो.

तांदूळ अनेक वर्षांपासून तांदळाचा वापर घरगुती स्किन केअरमध्ये केला जातो. तांदळाच्या पाण्यापासून टोनर तयार करून तो कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावता येतो किंवा मिस्ट प्रमाणे वापरता येते. याशिवाय तांदळाचे पीठ आणि दूध एकत्र करून फेस मास्क बनवा. हा मास्क साधारण १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर धुवा. तांदळाचे पीठ आणि मध एकत्र करून सौम्य स्क्रबसारखेही वापरले जाते. तांदळाच्या पाण्याचे आइस क्यूब्स तयार करून त्याने साधारण एक मिनिट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेला थंडावा मिळू शकतो.

बेसन स्किन केअरसाठी होममेड रेमेडीमध्ये बेसनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बेसन, दही आणि हळद एकत्र करून फेस पॅक तयार करता येतो. हा पॅक १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर पाण्याने धुवा. स्किन टॅनिंग कमी करण्यासाठी हे वापरता येते. बेसन आणि दूध एकत्र करून आइस क्यूब्स तयार करावे. या क्यूबने चेहऱ्यावर साधारण एक मिनिट हलक्या हाताने मसाज करून नंतर चेहरा धुवावा. तेलकट त्वचेसाठी बेसन आणि गुलाब जलपासून मास्क तयार करण्याची पद्धतही सांगितली जाते. बेसन, तांदळाचे पीठ आणि दूध एकत्र करून स्क्रब तयार करता येतो.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला