
कॅन्टिया पाम हे झाड एरिका पामसारखे दिसते. हे एक इनडोअर प्लांट आहे, जे तुम्ही फक्त बाल्कनीतच नाही तर बेडरूममध्येही ठेवू शकता. याला जास्त पाणी लागत नाही. कमी पाण्यात आणि प्रकाशातही ते हिरवे राहते. यामुळे घर थंड राहते.

जेड ही वनस्पती देखील खूप सुंदर आहे. हे लहान दिसणारे रोप घराचे सौंदर्य वाढवते. तुम्ही ते घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ठेवू शकता.

जेड वनस्पतीला फारशी काळजीही घ्यावी लागत नाही. तसेच त्याला दररोज पाणी देण्याची गरज नसते, ना त्याला खूप प्रकाश लागतो. त्यामुळे झाडांची आवड असेल तर तुम्ही हे नक्की लावू शकता.

पीस लिलीला पांढरी फुले येतात, जी खूप सुंदर दिसतात. हे झाड थोडंसं पाणी देऊनही बराच काळ हिरवं राहतं. घर सजवण्यासोबतच हे झाड हवाही शुद्ध करतं आणि तणावमुक्तीसाठी देखील खूप चांगलं मानलं जातं.

तुम्ही स्पायडर प्लांट घरात आणि बाहेरही ठेवू शकता. त्याची खूप कमी काळजी घ्यावी लागते. हे रोप कमी पाण्यातही जगते आणि तीव्र सूर्यप्रकाशात ते वाळत नाही. तहे झाड घरातील हवा शुद्ध करते आणि ऑक्सिजनची पातळी देखील वाढवते.