
टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म गुजरातमधील वडोदरा शहरात 17 नोव्हेंबर 1982 साली झाला आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे, पदार्पणात युसूफने तुफान बॅटिंग केल्यामुळे त्याला भारतीय चाहते त्याला कधीचं विसरणार नाहीत. त्याने अनेक मॅचमध्ये चांगली खेळी केली आहे.

आयपीएलच्या स्पर्धेत सुद्धा युसूफ पठाणने चांगली खेळी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक लगावले आहे. पुढच्या चार सीजनमध्ये त्याचा तो रेकॉर्ड कायम होता. त्यानंतर ख्रिस गेलने 30 चेंडूत धुवाधार शतक लगावून युसूफचा रेकॉर्ड तोडला.

2007 मध्ये ज्यावेळी युसूफला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने सिक्स मारुन फलंदाजीला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने गोलंदाजी सुद्धा केली होती.

आयपीएलमध्ये युसूफच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याने 24 एप्रिल 2014 मध्ये कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळताना 15 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.