
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

आता नुकताच झहीर इक्बाल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये झहीर इक्बाल याने पहिल्यांदाच आपल्या आणि सोनाक्षीच्या पहिल्या भेटीवर भाष्य केले.

झहीर इक्बाल म्हणाला की, माझी आणि सोनाक्षी सिन्हाची पहिली भेट ही सलमान खानच्या घरी झाली. मी 2013 पासून सलमान खानच्या सर्व पार्ट्यांमध्ये असायचो. मात्र, त्यावेळी माझी आणि सोनाक्षीची ओळख नव्हती.

तिला तर हे पण माहिती नव्हती की, असा कोणी व्यक्ती जगात आहे. त्यानंतर आम्ही सलमान खानच्या घरी चिल करत होतो, सर्वजण होते. त्यावेळी मी आणि सोनाक्षी पहिल्यांदा एकमेकांना बोललो.

आम्ही पाच तास बोलत होतो आणि आम्हाला त्यानंतर समजले की, पार्टी संपली आहे आणि सर्वजन निघून गेले. पहिल्या भेटीनंतर सात वर्षांनी लग्न सोनाक्षी आणि झहीर याने केले.