महत्त्वाचे 10 मुद्दे  : युतीवर नारायण राणेंची तुफान फटकेबाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजपने काल (18 फेब्रुवारी) युतीची घोषणा केली. आधी स्वबळाला कवटाळून बसलेली आणि भाजपवर सातत्याने टीका करणारी शिवसेना अखेर युतीसाठी राजी झाली. मात्र, त्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे. एकेकाळचे शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनीही शिवसेना-भाजप युतीवर तुफान फटकेबाजी केली. महत्त्वाचे 10 […]

महत्त्वाचे 10 मुद्दे  : युतीवर नारायण राणेंची तुफान फटकेबाजी
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजपने काल (18 फेब्रुवारी) युतीची घोषणा केली. आधी स्वबळाला कवटाळून बसलेली आणि भाजपवर सातत्याने टीका करणारी शिवसेना अखेर युतीसाठी राजी झाली. मात्र, त्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे. एकेकाळचे शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनीही शिवसेना-भाजप युतीवर तुफान फटकेबाजी केली.

महत्त्वाचे 10 मुद्दे  : युतीवर नारायण राणेंची तुफान फटकेबाजी

मुद्दा क्रमांक – 1

शिवसेना-भाजप युती झाल्याचं काल कुठेही उत्साह दिसला नाही, केवळ नेत्यांच्या समाधानासाठी युती झाली, त्यामुळे शिवसेना-भाजप ही युती फायद्याची होणार नाही – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 2

मला भाजपने खासदार केलं. मात्र कमिटमेंट पूर्ण झाल्या नाहीत. मग मी स्वबळावर लढावं नाहीतर काय करावं? मी भाजपचं काम करत घरी बसाव? – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 3

खासदारकीचा राजीनामा का द्यावा? मी भाजपचा सदस्य नाहीय. भाजपचं सदस्यत्व आहे का माझ्याकडे? – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 4

मी माझ्या पक्षाचं जाहीरनामा जाहीर करणार. आम्ही वेगळं लढतोय, आम्हाला याच्यातून वगळा, असं कळवणार. तसं पत्रही भाजपला पाठवणार – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 5

देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मुंबई महानगरापालिकेत, त्यामुळे ते पचवण्यासाठी सत्तेत हवं म्हणून युती झाली – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 6

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, असं युतीचं आहे – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 7

माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या (भाजप) सांगण्यावरुन झाला – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 8

सत्तेत असूनही उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी काही करु शकले नाहीत, सेना जनतेसाठी काहीच करु शकत नाही – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 9

खिशात राजीनामे घेऊन फिरतात, शिवसेना बोलेल तसा वागेल, असा पक्ष नाही – नारायण राणे

मुद्दा क्रमांक – 10

संजय राऊत किती बोलत होते, आता काय झालं? संजय राऊतांनी फजिती करुन घेतली – नारायण राणे