ShivSena: शिवसेनेचे 50 टक्के आमदार परततील, काँग्रेसच्या खासदार बाळू धानोरकरांना विश्वास, भाजपबाबतही केलं मोठं विधान

| Updated on: Jun 25, 2022 | 4:48 PM

शिवसेना ताज्या संकटात आहे. अशावेळी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. कट्टर शिवसैनिक राहिलेल्या आणि सध्या महाराष्ट्रात थेट लोकसभेत निवडून गेलेले बाळू धानोरकर हे खासदार. धानोरकर यांनी मातोश्रीच्या शैलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

ShivSena: शिवसेनेचे 50 टक्के आमदार परततील, काँग्रेसच्या खासदार बाळू धानोरकरांना विश्वास, भाजपबाबतही केलं मोठं विधान
उद्धव ठाकरे, बाळू धानोरकर
Follow us on

चंद्रपूर : शिवसेनेत उभ्या फुटीचे ताजे संकट सुरू आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेवर (Lok Sabha) काँग्रेसकडून एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) निवडून गेले. धानोरकर यांनी गुवाहाटीतील (Guwahati) बंडखोर शिवसेना आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री रूपात उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबतच सरकार चालवले. मात्र आता अचानक असे काय झाले? असा प्रश्न करत यामागे भाजपचा हात असल्याचे ठामपणे सांगितले. या बंडखोर आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ नको असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. मात्र भाजपला रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. 2014 व 2019 या दोन टर्ममध्ये केंद्रातील भाजप सरकारने अग्निपथसारख्या उफराटे निर्णय घेतले. यामुळे भाजपची ध्येय धोरणे देशाला ज्ञात झाली असल्याची टीका काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

समेट व्हायला हवा नाहीतर दरी वाढेल

गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांच्या महाराष्ट्रातील कार्यालये व कुटुंबीयांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. समेट व्हायला हवा नाहीतर दरी वाढून वेगळे वळण मिळेल, अशी भीती धानोरकर यांनी व्यक्त केली. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविल्यास 50% आमदार पक्षाच्या बाजूने पुन्हा येतील, अशी आशा खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. मातोश्रीच्या एकूण कार्यशैलीविषयी स्तुतीसुमने उधळत मी स्वतः शिवसेना आमदार असताना त्यांनी समंजसपणे अनेक विषय समंजसपणे हाताळल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. चंद्रपूरच्या स्थानिक भाजप नेत्यांशी जुळत नव्हते. त्यामुळं आपण शिवसेना सोडून काँग्रेसमधून खासदारकीचे तिकीट मिळवली असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या कार्यशैलीवर स्तुतीसुमने

शिवसेना ताज्या संकटात आहे. अशावेळी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. कट्टर शिवसैनिक राहिलेल्या आणि सध्या महाराष्ट्रात थेट लोकसभेत निवडून गेलेले बाळू धानोरकर हे खासदार. धानोरकर यांनी मातोश्रीच्या शैलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.खासदार धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये राहून शिवसेनेच्या कार्यशैलीवर सध्या स्तुतीसुमने उधळली. तीन महिन्यांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात उघड भूमिका घेतली होती. मात्र ताज्या संकटात आपली भूमिका बदलत शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हे सरकार चालले पाहिजे अशी भूमिका त्यांनी रेटली आहे.

हे सुद्धा वाचा