ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ दोन नेत्यांचा समर्थकांसह राजीनामा

| Updated on: Oct 29, 2022 | 11:30 AM

ठाकरे गटात सुरू असलेली गळती अद्यापही सुरूच आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांंचं शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, या दोन नेत्यांचा समर्थकांसह राजीनामा
Follow us on

सोलापूर : ठाकरे गटात सुरू असलेली गळती अद्यापही सुरूच आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांंचं शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोटमधील ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखासह शहर प्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. ठाकरे गटाचे हे सर्व पदाधिकारी लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे गटाला धक्का

अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अक्कलकोटचे तालुकाप्रमुख संजय देशमुख आणि शहर प्रमुख योगेश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील राजीनामा दिला असून, ते शिंदे गटात सामील होणार आहेत. यामुळे अक्कलकोटमध्ये ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

बुलडाण्याती कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

एकीकडे ठाकरे गटातून शिंदे गटात सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच बुलडाण्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला सुरू असलेली गळती रोखून पुन्हा एकदा पक्षाची घडी बसवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे राज्याव्यापी दौरे सुरू असल्याचं दिसून येत आहे.