Kangana Ranaut: जेव्हा हिंदू मुली संबंध ठेवतात…कंगना राणौतच्या नव्या विधानाने प्रचंड खळबळ; आता नवा वाद पेटणार?

Kangana Ranaut : कंगना रणौतने नुकताच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने असे काही वक्तव्य केले आहे जे ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

Kangana Ranaut: जेव्हा हिंदू मुली संबंध ठेवतात...कंगना राणौतच्या नव्या विधानाने प्रचंड खळबळ; आता नवा वाद पेटणार?
कंगना रणौैत
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 3:01 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. तिने काही दिवसांपूर्वीच हिंदू तरुणींना गटार छाप म्हटले होते. त्यानंतर कंगनाला चांगलेच ट्रोल करण्यात आले. कंगनाने पुन्हा एकदा नवे वक्तव्य केले आहे. तिच्या या व्हिडीओने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे. आता कंगना नेमकं काय म्हणाली? पाहा..

कंगनाने कोणावर केला हल्ला?

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, मी संसदेत जाण्यासाठी उशिर होत आहे, तरीही मी विचार केला की मी माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर करू. आज सकाळी मी काही पोस्ट करत होते. तेव्हा मी पाहिले की आमच्या चित्रपट उद्योगातील माझी एक बहीण आहे… मात्र, आम्ही चित्रपट उद्योगात अनेक अशा हिंदू बहिणी-मुलींना जवळून पाहिले आणि ओळखले आहे, ज्या हिंदू आहेत, पण राजकारण आणि धर्माबाबत त्यांची कोणतीही विचारधारा नाही.

पुढे कंगना म्हणाली की, ‘युवांमध्ये विशेषतः असे होते, ते खूपच तटस्थ असतात. पण जसे ते इस्लामिस्टच्या संपर्कात येतात, मग ती मैत्री असो, लग्न असो किंवा संबंध असो, त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते. त्या कट्टरपंथी बनतात. यात काही वाईट नाही, कारण संविधान तुम्हाला हे स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही धर्म किंवा विचारधारा स्वीकारू शकता. पण समस्या ही आहे की जेव्हा हिंदू मुलींची गोष्ट येते तेव्हा विचारसरणी बदलते.’

धर्मांतराबाबत कंगना स्पष्ट बोलली

कंगनाने पुढे म्हटले की, आता मी स्वतःचा बचाव करणार नाही कारण मी आयटम साँग केले. मी नेहमीच एक मध्यममार्गी हिंदू होते. आज जर मी स्वतःचा बचाव केला तर माहित नाही किती मुली लीप घेऊ शकणार नाहीत. मी म्हणेन की होय मी मध्यममार्गी हिंदू होते. माझ्यावर आज टोला मारला जातो की तू कधीपासून संघी बनलीस. होय, मला संघी व्हायचे आहे. मला भाजप आणि आरएसएसची विचारधारा व्हायची आहे. मला धर्मांतर करायचे आहे. मी का धर्मांतर करू शकत नाही?

समाजाचे ठेकेदार आहेत, ते अग्निपरीक्षेसाठी आमच्या १० वर्षे जुन्या गोष्टी आणतात की तू तर पार्टी करत होतीस, तू तर हे करत होतीस, ठीक आहे मी सगळे करत होते, पण आज मलाही धर्मांतर करायचे आहे. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचे आहे. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे? माझ्यासाठी हे दुटप्पी विचार चालणार नाहीत. मला वाटते की आमच्या मुलींनाही ते स्वातंत्र्य असावे. जर हिंदू मुलींना निश्चित हिंदूमध्ये धर्मांतर करायचे असेल तर त्या का होऊ शकत नाहीत?’ असे कंगना म्हणाली.

कंगना रनौतचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते कंगनाच्या स्पष्ट शैलीची प्रशंसा करत आहेत. काही चाहते तिला शेरनीचा टॅग देत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की तिच्याकडे आवाज उठवण्याची जिद्द आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us