काँग्रेसने झटक्यासाठी तयार रहावं, तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकणार नेता भाजपाच्या वाटेवर

| Updated on: Mar 06, 2024 | 12:33 PM

अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एक काँग्रेस नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. याचा जिल्ह्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होईल. काँग्रेसची ताकद आणखी कमी होईल. हा नेता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा अतिशय निकटवर्तीय मानला जायचा.

काँग्रेसने झटक्यासाठी तयार रहावं, तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकणार नेता भाजपाच्या वाटेवर
Congress Party
Follow us on

मुंबई (गणेश सोळंकी) : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी मागच्याच महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलय. मराठवाडा खासकरुन नांदेड जिल्ह्यात राजकारणावर अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे. आता सत्तेच बळ मिळाल्याने नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा प्रभाव वाढू शकतो. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या वाटेवर आहे. महत्त्वाच म्हणजे सध्या माजी आमदार असला तरी त्यांनी तीनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली आहे. अशा नेता भाजपामध्ये गेल्यास जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

दिलीप सानंदा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिली आहे. आज दिलीप सानंदा हे गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आहेत. दिलीप सानंदा हे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते.

कधीपासून आमदार होते?

मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचही बोललं जात आहे. दिलीप सानंदा यांनी 1999 साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हापासून ते सलग 2009 पर्यंत सलग तीनवेळा निवडून विधानसभेवर गेले. मात्र २०१४ साली भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यातून गेली. त्यावेळेला दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपका सुद्धा काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात निष्क्रिय झालेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सानंदा हे मुंबईत असून अमित शहा यांची भेट घेणार आहेत.