AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: नियमांमध्ये मोठे बदल, 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार?

EPFO Pension : तुम्ही 2026 मध्ये निवृत्त झालात तर तुम्हाला EPFO कडून दरमहा पेन्शन मिळेल. पेन्शनचा हा आकडा किती असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

EPFO: नियमांमध्ये मोठे बदल, 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार?
EpfoImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 02, 2026 | 7:35 PM
Share

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा विचार करणे हा चिंतेचा विषय असतो. कारण सरकारी नोकऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे स्थिर पेन्शन व्यवस्था नसते. त्यामुळे हा निर्णय घेताना वृद्धापकाळात आर्थिक परिस्थिती कशी असते अशी चिंता या लोकांना जाणवत असते. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल, तर अजिबात चिंता करू नका. कारण EPFO ​​EPS योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी देते. जर तुम्ही 2026 मध्ये निवृत्त झालात तर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळेल. पेन्शनचा हा आकडा किती असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पीएफ कपात झाल्यानंतर यातील एक भाग पेन्शनसाठी वाचवला जातो. यातून निवृत्तीनंतर दरमहा कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. मात्र या पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी काही अटी आहेत. पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी, कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षे सेवा (पेन्शनपात्र सेवा) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. साधारणपणे, 58 वर्षांच्या वयानंतर पूर्ण पेन्शन मिळते.

पेन्शनचे कॅल्क्युलेशन

EPFO ने सेट केलेल्या सोप्या सूत्राचा वापर करून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. (पगार × एकूण सेवा वर्षे) / 70. या सूत्राच्या मदतीने तुम्ही पेन्शनची रक्कम जाणून घेऊ शकता. EPFO ​​नियमांनुसार तुमच्या पेन्शनची (मूलभूत पगार + DA) गणना करण्यासाठी कमाल पगार मर्यादा दरमहा 15000 रुपये निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की तुमचा मूळ पगार लाखांमध्ये असला तरीही, तुमचे पेन्शन 15000 रुपयांच्या आधारावर मोजले जाईल. सेवेची वर्षे आणि पगार याचा गुणाकार केला जाईल आणि येणाऱ्या आकड्याला 70 ने भाग दिला जाईल. येणारे उत्तर हे तुमची पेन्शन असेल.

तुम्ही 2026 मध्ये निवृत्त झालात तर..

जर किशोर नावाचा कर्मचारी 2026 मध्ये निवृत्त झाला, तर आपण असे समजू की त्यावेळेपर्यंत त्याचा एकूण सेवा किंवा EPS योगदान कालावधी 50 वर्षे आहे. पेन्शन मोजण्यासाठी कमाल वेतन मर्यादा 15000 रुपये निश्चित असल्याने, किशोरचे पेन्शन खालीलप्रमाणे मोजले जाईल.

15000 (पगार) × 50 (वर्षे) ÷ 70 = 10714 रुपये (अंदाजे). यानुसार, किशोरला निवृत्तीनंतर दरमहा अंदाजे 10714 रुपये पेन्शन मिळेल. या सूत्रात वय देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर किशोरने वय 58 होईपर्यंत वाट पाहिली नाही, आणि 50 वर्षांच्या वयात पेन्शन घेण्यास सुरुवात केली, तर त्याला तोटा होईल. नियमांनुसार, त्याला दरवर्षी 4 टक्के कमी पेन्शन मिळेल.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...