AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज हा निकाल दिला. एकनाथ शिंदे निकालाच्या वेगवेगळ्या पैलूबद्दल बोलले.

Eknath Shinde | विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया
eknath shinde Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 10, 2024 | 8:18 PM
Share

MLA Disqualification Case | महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिला. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. “अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाही, हिंदुत्वाचा विजय झाला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “एकाधिकारशाही, घराणेशाही, मक्तेदारी यांना चपराक मिळाली. त्यांचा पराभव झाला” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“लोकशाहीमध्ये कोणालाही पक्ष संघटना मालमत्ता मानून मनमानी निर्णय घेता येणार नाही, हे सिद्ध झालय. भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून तसच शिवसेना खरी कोणाची? याला सुद्धा मान्यता दिलीय” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “हा निर्णय स्वागतार्ह आहे, यापुढे अशा प्रकारची मनमानी कोणाला करता येणार नाही हे सिद्ध झालं” असं शिंदे म्हणाले.

‘त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?’

उद्धव ठाकरे यांनी मॅच फिक्सिंग असल्याच निकालावर म्हटलय. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “निकाल बाजूने लागला, तर मॅच फिक्सिंग नाही आणि मेरीटवर निकाल येतो, तेव्हा मॅच फिक्सिंग. निकाल विरोधात गेला, तर ते निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाला सल्ला देतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?” “लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर 2019 मध्ये जनतेने शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडून दिलं होतं” याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करुन दिली.

शिंदेंची शिवसेना निकालाबद्दल कायदेतज्ज्ञांशी बोलणार

सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षण नोंदवलेली, त्यापेक्षा वेगळा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “निकालाबद्दल कायदेशतज्ज्ञांशी बोलू. निकालावर चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. आजच्या निकालात मनमानी कारभारावर बोट ठेवलय” असं शिंदे म्हणाले. आजचा निकाल हा उद्धव ठाकरे गटासाठी झटका आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट