MLA Disqualification Case | ‘लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी…’ आदित्य ठाकरे खवळले
MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात अखेर निकाल आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

भूषण पाटील
MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. सगळ्या देशाच लक्ष या निकालाकडे लागल होतं. कारण भविष्यात अशाच प्रकारच्या अन्य प्रकरणात हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे. राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत मान्यता दिलीय. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा झटका आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ते उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आहेत. “मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे” अशा शब्दात निकालावर संताप व्यक्त केला.
“विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांच राजकारण झालं, तर अशाच प्रकारे त्यांना वाचवलं जाणार” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायच आहे, ते स्पष्ट झालं” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
‘राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते….’
“अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते?. लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत, अस असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक. जगाला आता कळलेलं आहे की, आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेली आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
