AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Disqualification Case | राहुल नार्वेकरांच्या निकालावर जितेंद्र आव्हाड यांची फक्त 5 शब्दात प्रतिक्रिया

MLA Disqualification Case | सगळ्यांच लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणारवर अखेर निकाल आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. बऱ्याच महिन्यांपासून आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेत नाही, म्हणून टीका सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील विधानसभा अध्यक्षांना फटकारलं होतं.

MLA Disqualification Case | राहुल नार्वेकरांच्या निकालावर जितेंद्र आव्हाड यांची फक्त 5 शब्दात प्रतिक्रिया
jitendra awhad
| Updated on: Jan 10, 2024 | 6:48 PM
Share

MLA Disqualification Case | सगळ्या देशाच लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल वाचन केलं. कारण आजचा महाराष्ट्र विधिमंडळातील निकाल भविष्यात अशाच प्रकारच्या अन्य प्रकरणात मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सगळ्या देशाच लक्ष महाराष्ट्र विधिमंडळातील निकाल वाचनाकडे होते. शिंदे गट की, उद्धव ठाकरे गट असा प्रश्न होता. अखेर राहुल नार्वेकर यांनी 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य मानून निकाल दिला. त्यानुसार, राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला वैध ठरवलं. त्यामुळे 16 आमदारांवरील अपात्रतेचा धोका टळलाय. त्यांनी शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य केलं. 23 जानेवारी 2018 रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. शिंदे गटाने 1999 सालची पक्षाची घटना दिली होती, त्याला विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवलय. 2018 सालची घटना वैध ठरवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावलीय.

आधीच सुरु झालेली टीका

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महानिकालाच वाचन करण्याआधी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका सुरु होती. निकाल आधीच ठरलाय. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार, असं सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले होते.

जितेंद्र आव्हाड यांची पाच शब्दात प्रतिक्रिया काय?

आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच भूमिका घेतली आहे. अलीकडचे प्रभू रामचंद्रांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी फक्त पाच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. येह तो होना ही था …… असं त्यांनी म्हटलय.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.