पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? : अजित पवार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? महाजन कुटुंबात एवढं मोठं महाभारत का घडलं? आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये.”, अशा शब्दात […]

पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? : अजित पवार
Follow us on

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? महाजन कुटुंबात एवढं मोठं महाभारत का घडलं? आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये.”, अशा शब्दात अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला. याआधी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

अजित पवार नेमके काय म्हणाले?

“शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्यातले संबंध काय, आपली राजकीय कारकीर्द किती, आपण बोलतो किती, याचं भान न ठेवता पूनम महाजन यांनी आमच्या दैवतावर टीका केली. पण महाजन कुटुंबात भलं मोठं महाभारत का घडलं? याचं उत्तर त्यांना देता येईल का?”, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आम्ही पातळी सोडत नाही, याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु, असं समजू नये, असंही पूनम महाजन यांनी म्हटलं. बारामती तालुक्यातल्या कुरणेवाडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.

तीन उदाहरणं देऊन पूनम महाजनांना उत्तर, पवारांच्या समर्थनार्थ नातू रोहित पवार मैदानात

“पूनम महाजन, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं, हे महाभारत कसं घडलं कशामुळे घडलं, हे विचारलं तर? एकाच आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या भावाचा दुसरा भाऊ खून का करतो, याचं उत्तर देता येईल का? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला बोलता येतं तसं आम्हाला ही बोलता येतं. पण आम्ही पातळी सोडत नाही. याचा अर्थ असा नाही की काहीही आम्ही सहन करु.”, असा इशाराच अजित पवारांनी पूनम महाजन यांना दिला.

पूनमताई, प्रमोद महाजनांना प्रवीणने गोळ्या का झाडल्या, हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाहीत : आव्हाड

पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?

“तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामासारखं सगळ्या ठिकाणी नाक लावून लावून महाभारत सुरु केलं, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितलं ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळालं नाही ना, तर इकडचं तिकडे आणि तकडचं इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत.” असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.