PM Modi Birthday | अजित पवार-पार्थ पवारांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य आणि उच्च आकांक्षा लाभोत, अशा शुभेच्छा पार्थ पवार यांनी दिल्या आहेत.

PM Modi Birthday | अजित पवार-पार्थ पवारांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
| Updated on: Sep 17, 2020 | 11:20 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार आणि पार्थ पवारांनी मोदींना सदिच्छा दिल्या. (Ajit Pawar Parth Pawar wishes PM Narendra Modi on his birthday)

“आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि उच्च आकांक्षा लाभोत.” अशा शुभेच्छा पार्थ पवार यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या –

वडनगरचा सुपुत्र ते पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीतील 12 फोटो

पंतप्रधान मोदींचा 70 वा वाढदिवस, भाजपचा जल्लोष, राहुल गांधी ते नेपाळच्या पीएमकडून शुभेच्छा

(Ajit Pawar Parth Pawar wishes PM Narendra Modi on his birthday)